-
ऋजुता लुकतुके
अमेरिकेतील टेक कंपनी ॲपल आपला नवीन आयफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे अध्यक्ष टिम कूक (Tim Cook) यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या कार्यक्रमाची घोषणा केली होती. यात ‘कुटुंबातील नवीन सदस्याच्या स्वागतासाठी तयार राहा,’ असा संदेश त्यांनी लिहिला आहे. त्यामुळे हा सोहळा नवीन स्वस्तातील आयफोन एसई ४ (Apple iPhone SE 4) च्या स्वागतासाठी असेल असा सगळ्यांचा अंदाज आहे.
याशिवाय, कंपनी नवीन पॉवरबीट्स प्रो २ इयरबड्स, एम४ मॅकबुक एअर, एम३ आयपॅड एअर आणि ११व्या पिढीचे आयपॅड देखील लाँच करू शकते. हा कंपनीचा सर्वात स्वस्त फोन असेल आणि त्याची किंमत आयफोन १५ पेक्षा कमी असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोन ४९९ अमेरिकन डॉलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. भारतीय चलनानुसार, हे अंदाजे ४३,५०० रुपये होतात.
(हेही वाचा – “हमें बाज बनना है, धोकेबाज नाही…” ; Eknath Shinde यांचे कार्यकर्त्यांना निर्देश)
Get ready to meet the newest member of the family.
Wednesday, February 19. #AppleLaunch pic.twitter.com/0ML0NfMedu
— Tim Cook (@tim_cook) February 13, 2025
या स्वस्त आयफोन बायोनिक ए१८ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. आयफोन १६ मध्ये बायोनिक ए१८ चिपसेट देखील आहे, ज्यामुळे फोन जलद काम करतो.
आयफोन १६ (iPhone 16) मालिकेप्रमाणे, आयफोन एसई ४ (Apple iPhone SE 4) मध्ये ८ जीबी रॅम आहे. ॲपल इंटेलिजन्स तंत्रज्जानही वापरण्यात आलं आहे. या कॉम्पॅक्ट आयफोनमध्ये ओएलईडी पॅनेलवर आधारित लहान ६.१ इंचांचा डिस्प्ले आहे. आणि यात सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे.
आयफोन एसई ४ (Apple iPhone SE 4) मध्ये फोटोग्राफीसाठी ४८ मेगा पिक्सेलचा सिंगल कॅमेरा आहे. आणि त्यात फ्लॅश लाईटही बसवण्यात आला आहे. सेल्फी तसंच व्हिडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community