लिंबू आणि मध यांमधून शरीराला आवश्यक असे अनेक गुणधर्म मिळत असतात. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. मध बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो, तर लिंबू अँटीव्हायरल आहे. या दोन्ही गोष्टींचा वापर आपण संसर्गापासून वाचण्यासाठी आणि संसर्ग बरा करण्यासाठी घरगुती उपचारांमध्ये करतो. लिंबू आणि मध त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर आहे. या दोन्हीही गोष्टी त्वचेच्या संसर्गला कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच ते पिगमेंटेशन देखील कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त लिंबूमध्ये असलेल्या जीवनसत्व सी त्वचेची चमक सुधारते आणि वृद्धत्वाची चिन्हे देखील कमी करते. चला जाणून घेऊया दोन्ही एकत्र लावल्याने त्वचेला कोणते फायदे होतात.
१. मृत पेशींची सफाई
लिंबू आणि मध एकत्र लावल्याने तुमच्या त्वचेवरील सर्व मृत पेशी काढून टाकू शकतात. या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी एक उत्तम स्क्रब म्हणून काम करते. लिंबू आणि मधाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मृत पेशी साफ होतात आणि छिद्र आतून स्वच्छ करतात. यामुळे त्वचेची छिद्रे ब्लॉक होत नाहीत आणि चेहऱ्यावर पिंपल्सही येत नाहीत. यासोबतच लिंबू आणि मध चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यास आणि त्वचेला आतून पोषण देण्यास मदत करतात.
२. त्वचा गोरी करण्यास प्रभावी
लिंबू आणि मधाचे मिश्रण त्वचा गोरी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे मिश्रण पिगमेंटेशन कमी करण्यासोबतच चेहऱ्याचा रंग सुधारते. याशिवाय, त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या आत प्रदूषण आणि अतिनील किरणांमुळे होणारे सूक्ष्म रॅडिकल्सचे नुकसान कमी करतात आणि त्वचा पांढरी करण्यास मदत करतात.
३. त्वचेच्या डागांवर उपचार
लिंबूमध्ये असलेले ऍसिडिक घटक डाग कमी करण्यास मदत करतात. मधामध्ये असलेले अँटीमाइक्रोबियल गुणधर्म चेहऱ्यावरील डाग दूर करण्यातही खूप मदत करतात.
Join Our WhatsApp Community