उन्हाळ्यात चेहऱ्यावर माती लावल्याने होतात ‘हे’ परिणाम

197
अमित शहा

सध्या आपल्या येथील हवामानाचा काही अंदाज लावता येत नाही. कधी पाऊस, कधी थंडी, तर कधी अगदी रखरखीत ऊन. अशावेळी चेहऱ्याची काळजी नेमकी कशी घ्यावी हे समजत नाही. मग आपण महागडे आणि वेगवेगळे फेस पॅक यांच्याकडे वळतो. मात्र तरीदेखील हवा तसा परिणाम काही जणांना मिळत नाही. मोठंमोठ्या शहरात तर प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि अगदी नैसर्गिक पद्धतीचा फेस पॅकचा उपयोग करणं सोयीचं ठरतं.

प्रत्येक वयोगटातील माणसांसाठी आणि प्रत्येक प्रकारच्या चेहऱ्यासाठी मुलतानी माती हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. मात्र मुलतानी माती चेहऱ्यावर योग्य पद्धतीने लावणं गरजेचं आहे. मुलतानी मातीचा पॅक दहीसोबत, मधासोबत, गुलाब जल तसेच टोमॅटोच्या रसा सोबत तयार करून त्याचा वापर करून शकतो.

(हेही वाचा H3N8 बर्ड फ्लूने घेतला जगातील पहिला बळी; चीनमधील महिलेचा मृत्यू)

एक चमचा टोमॅटोचा रस, एक चमचा मुलतानी माती आणि अर्धा चमचा हळद वापरून पॅक तयार करून लावावा. तसेच गरजेनुसार मुलतानी माती घेऊन ती व्यवस्थित भिजेल इतक्या प्रमाणात गुलाबजल घेऊन त्याचा पॅक तयार करावा. दह्यासोबत तयार केलेला मुलतानी मातीचा पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटं राहू द्यावा. मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. शिवाय ती सहज उपलब्ध देखील होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.