Term Insurance घेताना तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीत ना?

139

मुदत विमा ( Term Insurance) हा तुमच्या माघारी तुमच्या कुटुंबाचे वित्तीय भवितव्य सुरक्षित करण्याचा एक सशक्त पर्याय आहे. हा विमा घेताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.  या 5 चुका टाळणे आवश्यक आहे.

सुरक्षा रकमेचे नियम

सुरक्षा रक्कम ठरवण्यासाठी 20 गुणिले तुमचे वार्षिक उत्पन्न हा thumb rule Formula वापरला जातो. त्यात अनेक गोष्टींची सरासरी गृहित धरलेली असते. त्यामुळे तुमच्या गरजांसाठी तो उपयुक्त असेलच असे नाही. गरजा लक्षात घेऊन सुरक्षा रक्कम ठरवून घ्या.

चुकीचा पे- आऊट पर्याय

कोट्यावधीची लाॅटरी लागल्यानंतर चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्यामुळे दिवाळखोर झालेल्या लोकांच्या कहाण्या तु्म्ही ऐकल्या असतील. तुमच्या माघारी तुमच्या कुटुंबाच्या हातातही अशीच मोठी रक्कम पडणार असते. तिचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी योग्य पे आऊट पर्याय तुम्ही निवडायला हवा, एकरकमी, मासिक उत्पन्न अथवा एकरकमी मासिक उत्पन्न असे पर्याय यात उपलब्ध असतात.

रायडर्सला नकार

टर्म पाॅलिसीसोबत काही रायडर्स अथवा अॅण्ड- ऑन्स असतात. अनेकजण ते नाकारतात. तथापि, ते रायडर्स तुम्हाला संकटकाळी उपयोगी ठरु शकतात. उदाहरणार्थ आजारविषयक रायडर तुम्ही स्वीकरला असेल, तर गंभीर आजाराच्या वेळी तो तुमच्या आर्थिक गरजा भागवू शकतो. त्यामुळे रायडर्स नकारणे टाळले पाहिजे.

क्लेम सेटलमेंट शो

साधारणत: कंपन्यांच्या वेबसाईटवरील क्लेम सेटलमेंट रेशो बघून लोक टर्म पाॅलिसी घेतात, पण हा आकडा फसवा असू शकतो किंवा छोट्या रकमांचे दावेच कंपनीने निकाली काढलेले असू शकतात. मोठे दावे नाकारलेले असू शकतात. त्यामुळे क्लेम सेटलमेंट रेशो चांगला असूनही तुमच्या कुटुंबाच्या हाती निराशा येऊ शकते.

( हेही वाचा: दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणारे ‘हे’ ऐतिहासिक बेट माहितीय का? )

स्वत: अर्ज न भरणे

टर्म इन्शुरन्सच्या अर्जात चुकीची माहिती भरली गेली असेल, तर तुमच्या माघारी कुटुंबाच्या पदरी निराशा येऊ शकते. त्यामुळे विमा एजंट अथवा सल्लागाराकडून अर्ज भरुन घेणे टाळले पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.