घराच्या सजावटीसाठी हल्ली कृत्रिम फुलं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. ही फुलं हुबेहूब खऱ्या फुलांसारखीच दिसतात. चांगल्या दर्जाची कृत्रिम फुलं बराच काळ टिकू शकतात. या फुलांमुळे कोणत्याही जागेला एक सुंदर लूक मिळू शकतो.
आपल्या घराच्या सजावटीसाठी कृत्रिम फुलं निवडताना त्या फुलांचं साहित्य, रंग, पृष्ठभाग आणि इतर स्टायलिंग टिप्सचा विचार करून तुम्ही तुमच्या घरासाठी सर्वात योग्य कृत्रिम फुलं नक्कीच निवडू शकता.
(हेही वाचा – Tesla in India : टेस्ला कंपनीचा भारतात चंचूप्रवेश, सुरू केली नोकरभरती)
घराच्या सजावटीसाठी कृत्रिम फुलं का निवडायची?
घराच्या सजावटीसाठी हल्ली कृत्रिम फुलं लोकप्रिय झाली आहेत. कारण ती खऱ्या फुलांपेक्षा जास्त काळ टिकू शकतात. घराच्या सजावटीसाठी कृत्रिम फुलांना जास्त पसंती मिळण्याची काही प्रमुख कारणं खाली दिलेली आहेत…
- दीर्घकाळ टिकणारे सौंदर्य
कृत्रिम फुलं ही खऱ्या फुलांसारखी सुकत नाहीत. कृत्रिम फुलांचा टवटवीतपणा कायम राहतो. चांगल्या दर्जाच्या कृत्रिम फुलांना जास्त देखभालीची आवश्यकता नसते.
- कमी देखभाल करावी लागते
कृत्रिम फुलांना पाणी, इतर देखभालीची किंवा सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. त्यामुळे ही फुलं डेकोरेशन करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
- खिशाला परवडणारी असतात
चांगल्या दर्जाची कृत्रिम फुलं विकत घेताना महाग वाटत असली तरी, ती एकदाच खरेदी केली जातात. ती फुलं वर्षानुवर्षं टिकतात त्यामुळे सतत खरी फुलं खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे इथे वाचवता येतात.
- ऍलर्जी-मुक्त
बऱ्याच लोकांना काही फुलांच्या एलर्जी असतात. त्यामुळे त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. पण कृत्रिम फुलांमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या एलर्जीचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुला फुलांच्या सजावटीचा आनंद घेऊ शकता.
- वर्षभर उपलब्ध असतात
कृत्रिम फुलांसाठी कोणत्याही ठराविक ऋतूची वाट पाहावी लागत नाही. ही फुलं वर्षभर उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये घराच्या सजावटीसाठी तुम्हाला विचार करावा लागत नाही.
- पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल पर्याय
लिलीसारखी काही फुलं पाळीव प्राण्यांसाठी हानिकारक असू शकतात. पण कृत्रिम फुलं सजावटीसाठी वापरली तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही.
(हेही वाचा – Shardul Thakur : मुंबईकर तेज गोलंदाज शार्दूल ठाकूर एसेक्स काऊंटीकडून खेळणार)
खऱ्या दिसणाऱ्या चांगल्या कृत्रिम फुलांची निवड कशी करावी?
सर्वोत्तम कृत्रिम फुलं निवडण्यासाठी तुम्हाला त्याचे साहित्य, पोत आणि रंग यासारख्या तपशीलांवर बारीक लक्ष द्यावं लागेल.
- उच्च-गुणवत्तेचं साहित्य निवडा
कृत्रिम फुलांचं साहित्य हे, ती फुलं किती खरी वाटतात यासाठी मोठी भूमिका बजावते. जसं की,
- रेशीम फुलं – ही सर्वात सुंदर कृत्रिम फुलांपैकी एक आहेत. नाजूक पृष्ठभाग आणि सुंदर दिसणाऱ्या पाकळ्या यामुळे ही फुलं खरी असल्यासारखीच भासतात.
- लेटेक्स फुलं – ही फुलं खऱ्या फुलांना साजेसं प्लास्टिकचं साहित्य वापरून तयार केलेली असतात. त्यामुळे ती हुबेहूब खऱ्या फुलांसारखीच दिसतात.
- पॉलिस्टर फुलं – ही फुलं काहीशी महाग असली तरीही वन टाईम इन्व्हेस्टमेंट असतात. दिसायला सुंदर आणि बराच काळ टिकणारी ही फुलं नक्कीच आनंद देतात.
- फोम फुलं – गुलाब आणि पेनीची कृत्रिम फुलं तयार करण्यासाठी फोमचाही वापर करण्यात येतो. फोमची फुलं खूप नाजूक असतात.
(हेही वाचा – PVR-INOX ने जाहिराती दाखवून वेळ फुकट घालवल्याबद्दल खटला केला दाखल ; न्यायालयाने काय म्हटले?)
पाकळ्यांच्या कलाकृतीकडे लक्ष द्या
खऱ्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये अतिशय सूक्ष्म फरक असतात. म्हणून चांगल्या दर्जाची कृत्रिम फुलं खरेदी करताना, त्यांच्या कलाकृती हुबेहूब आहेत का, हे तपासून घ्यायला पाहिजे. जसं की,
- रंगांच्या फरकांसह पाकळ्या
- पाकळ्यांच्या मऊ कडा
- गुळगुळीत पाकळ्यांऐवजी नैसर्गिक पोत असलेला पृष्ठभाग
नैसर्गिक दिसणारे रंग निवडा
चमकदार, अनैसर्गिक रंग असलेली कृत्रिम फुलं आकर्षक दिसत नाहीत. त्याऐवजी, ताज्या फुलांसारखे दिसणारे हलक्या रंगांच्या वास्तववादी शेड्स निवडा.
- फुलांच्या नैसर्गिक लूकसाठी सर्वोत्तम रंग : सॉफ्ट पिंक, ब्लश, आयव्हरी, क्रीम, पीच आणि लेव्हेंडर.
- टाळायचे रंग : निऑन रंग आणि जास्त चमकदार कृत्रिम शेड्स.
(हेही वाचा – jeera water benefits : जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला कोणते पाच फायदे मिळतात?)
देठ आणि पानांची नैसर्गिक रचना
कृत्रिम फुलांचे देठ आणि पाने देखील नैसर्गिक दिसायला हवे. त्यासाठी काही गोष्टी तपासून घ्या.
- देठ पूर्णपणे सरळ असण्याऐवजी नैसर्गिकपणे वाकलेले असायला हवे.
- पानांमध्ये चमकदार प्लास्टिक लूकऐवजी शिरा आणि मॅट फिनिश असायला हवे.
- काही उच्च दर्जाच्या कृत्रिम फुलांमध्ये नैसर्गिकपणा दिसण्यासाठी काटेरी फुलं किंवा पोत डिटेल्समध्ये सजवलेले असतात.
काही कृत्रिम फुलं ही इतरांपेक्षा अधिक नैसर्गिक दिसतात. जसं की,
- गुलाब – नाजूक, थरांच्या पाकळ्या असलेले रेशीम किंवा फोम गुलाब निवडा.
- पिओनीज – मऊ आणि मोठ्या आकाराचे कृत्रिम पिओनीज सुंदर आणि नैसर्गिक दिसतात.
- सूर्यफूल – नैसर्गिक दिसण्यासाठी चांगले पोत असलेले पृष्ठभाग आणि किंचित कुरळ्या पाकळ्या निवडा.
- ट्यूलिप – लेटेक्स ट्यूलिप हे दिसण्यात आणि स्पर्श केल्यास ताज्या ट्यूलिपसारखेच वाटतात.
- ऑर्किड – नाजूक पाकळ्या आणि जुळवून घेण्यायोग्य देठ असलेले कृत्रिम ऑर्किड आश्चर्यकारकपणे नैसर्गिक दिसतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community