Asian Games in India : पहिल्या वहिल्या आशियाई क्रीडास्पर्धा भारतातच झाल्या होत्या तुम्हाला ठाऊक आहे का?

Asian Games in India : जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनीच या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला.

18
Asian Games in India : पहिल्या वहिल्या आशियाई क्रीडास्पर्धा भारतातच झाल्या होत्या तुम्हाला ठाऊक आहे का?
  • ऋजुता लुकतुके

जशी जागतिक स्तरावर ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा होते, तशीच आशियाई स्तरावर आशियाई क्रीडा स्पर्धा भरवण्यात येतात. आणि विशेष म्हणजे अशी पहिली स्पर्धा १९५१ मध्ये भारतातच नवी दिल्ली इथं झाली होती. तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आशियाईत अनेक देश नुकते स्वतंत्र होऊ लागले होते. अशावेळी आशियातही क्रीडास्पर्धा व्हाव्यात अशी प्रबळ इच्छा या नव्याने जन्माला आलेल्या किंवा स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये होती. त्याला मूर्त स्वरुप १९४८ च्या लंडन ऑलिम्पिक दरम्यान मिळालं. त्यापूर्वी भारत स्वतंत्र होण्याच्या काही महिने आधी नवी दिल्लीतच आशियाई देशांची एक बैठक झाली होती. तिथे ऑलिम्पिकच्या धर्तीवर स्पर्धा भरवण्याचा विचार एकमताने मंजूर झाला होता. (Asian Games in India)

(हेही वाचा – मध्य रेल्वेवर रविवारी Mega Block; काय आहे वेळापत्रक?)

पण, लंडन ऑलिम्पिकदरम्यान त्याला संघटित रुप आलं. आशियाई संघटना उभी राहिली आणि या बैठकीसाठीही भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. सुरुवातीला पहिली स्पर्धा लगेचच १९५० मध्ये भारतात नवी दिल्ली इथं घ्याचं ठरलं. पण, तोपर्यंत स्टेडिअम उभारणी आणि इतर कामं पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे ही स्पर्धा एक वर्षं पुढे ढकलून १९५१ मध्ये झाली. त्यासाठी नवी दिल्लीत नॅशनल स्टेडिअम उभं राहिलं आणि इथेच सर्वच्या सर्व स्पर्धा पार पडल्या. ११ देशांचे एकूण ४८९ ॲथलीट या स्पर्धेत सहभागी झाले होते आणि एकूण ५७ सुवर्ण पदकं पणाला लागली होती. जपानने स्पर्धेत ६० पदकं जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. तर भारताला ५१ पदकं मिळाली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर पुढील आशियाई स्पर्धा १९५४ मध्ये फिलिपीन्सच्या मनिला इथं झाल्या. तेव्हापासून पुढे स्पर्धा दर चार वर्षांनी व्हायला लागल्या. (Asian Games in India)

(हेही वाचा – ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन Waqf Act 1995 ला देणार आव्हान; मागील ७० वर्षांत वक्फ बोर्डाने हडपलेल्या जमिनीही उघडकीस येणार?)

भारताला आणखी एकदा या स्पर्धा आयोजनाची संधी मिळाली ती १९८२ मध्ये. तेव्हाच्या पंतप्रधान आणि जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी यांनी यावेळी स्पर्धा भरवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांचा मुलगा राजीव गांधी याने आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. डिसेंबर महिन्यात झालेल्या या स्पर्धेत २१ खेळांमध्ये एकूण १९६ प्रकार पार पडले. अप्पू हा या खेळांचा मॅस्कॉट होता. या स्पर्धेसाठी जवाहरलाल नेहरु हे आताचं शहरातील मोठं स्टेडिअम उभारण्यात आलं होतं. चीन आणि जपान या दोन देशांनी प्रत्येकी १५३ पदकांची लयलूट केली. पण, सुवर्ण पदकं चीनकडे जास्त होती. चीनला ६१ तर जपानला ५७ सुवर्ण पदकं मिळाली. भारताला या स्पर्धेत एकूण ५७ पदकं मिळाली आणि भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेनंतर आतापर्यंत भारतातील एकाही शहराला आशियाई क्रीडास्पर्धा भरवण्याचा मान मिळालेला नाही. (Asian Games in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.