assistant sub inspector of police : असिस्टंट सब इन्स्पेक्टर कोण असतो? कोणकोणत्या जबाबदार्‍या त्याच्यावर असतात?

70
assistant sub inspector of police : असिस्टंट सब इन्स्पेक्टर कोण असतो? कोणकोणत्या जबाबदार्‍या त्याच्यावर असतात?

असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक होय. समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थित आहे ना, हे तपासण्यासाठी असिस्टंट सब इन्स्पेक्टर आपलं कर्तव्य बजावतात. असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे भारतीय पोलीस दलातील सर्वात महत्त्वाचे अधिकारी असतात. देशातील सर्व गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी ते विभागातल्या इतर लोकांसोबत काम करतात.

असिस्टंट सब इन्स्पेक्टर हा पोलीस हेड कॉन्स्टेबलपेक्षा वरचा पण सब इन्स्पेक्टरपेक्षा खालचा रँक असलेला पोलीस अधिकारी असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा खालच्या रँकच्या अधिकाऱ्यांचे पर्यवेक्षण करणे, गुन्ह्यांचा तपास करणे आणि त्यांची नियुक्ती असलेल्या भागात गस्त घालणे यांसारख्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. (assistant sub inspector of police)

(हेही वाचा – Cyclone: बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ; ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार)

असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदाचा इतिहास

ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत भारतामध्ये औपचारिक पोलीस दलाची स्थापना केली. उच्च रँकचे अधिकारी आणि खालच्या रँकचे हवालदार यांच्यातील एक दुवा म्हणून काम करण्यासाठी या संरचनेमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे पद तयार केलं गेलं.

समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात, कित्येकदा प्रशासकीय कामे हाताळण्यात आणि खालच्या रँकच्या पदांवर देखरेख करण्यासाठी असिस्टंट सब इन्स्पेक्टरची महत्त्वपूर्ण भूमिका असते. (assistant sub inspector of police)

(हेही वाचा – Ind vs NZ, 2nd Test : उर्वरित २ कसोटींसाठी भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश )

१९४७ साली भारताने ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवलं त्यावेळी पोलीस संरचनेत काही बदल करण्यात आले. असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे पद महत्त्वाचं राहिलं, पण राज्यानुसार त्यांची भूमिका थोडी बदलली.

आजही असिस्टंट सब इन्स्पेक्टर हा भारतीय पोलीस दलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांना नेमून दिलेल्या कामांमध्ये पुढे दिलेल्या कामांचा समावेश असतो. (assistant sub inspector of police)

(हेही वाचा – Maharashtra Vidhansabha Election 2024: मोठी बातमी! महायुती आणि मनसे एकत्र येणार? मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली चर्चा)

  • आपल्या विभागातल्या पोलीस हवालदारांचं नेतृत्व आणि देखरेख करणे.
  • आपल्या औपचारिकपणे नेमून दिलेल्या भागात गस्त घालणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणे.
  • गुन्ह्यांचा तपास करणे आणि पुरावे गोळा करणे.
  • वेगवेगळ्या सामाजिक समुदायांपर्यंत पोहोचणे आणि गुन्हेगारी प्रतिबंधक उपक्रम राबवणे इत्यादी.

आधुनिक पोलीस दलातली गुंतागुंत सोडवण्यासाठी असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासावर जास्त भर देण्यात आला आहे. एकंदरीतच कायद्याची अंमलबजावणी आणि सार्वजनिक सुरक्षेमध्ये आपले महत्त्व कायम ठेवत, बदलत्या काळाशी जुळवून घेत भारतीय पोलीस दलाचा आधारस्तंभ म्हणून असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे पद टिकून आहे. (assistant sub inspector of police)

(हेही वाचा – Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांनी रेकी करून कामगारांना केले लक्ष्य)

असिस्टंट सब इन्स्पेक्टरवर असलेल्या जबाबदाऱ्या

पर्यवेक्षण : असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे त्यांच्यापेक्षा खालच्या रँकवर असलेल्या हवालदार आणि अधिकाऱ्यांचे पर्यवेक्षण करतात.

तपास : असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकरणांवर काम करतात. ते पुरावे गोळा करतात, प्रकरणाशी संबंधित लोकांची मुलाखत घेतात आणि केस फाइल्स तयार करतात.

सुरक्षा : असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी नेमून दिलेल्या भागात गस्त घालतात. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य तो प्रतिसाद देतात.

गर्दी नियंत्रण : असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दीचे व्यवस्थापन देखील करतात. ते सार्वजनिक कार्यक्रम किंवा निषेध आणि संपाच्या वेळी आपलं कर्तव्य बजावतात.

रेकॉर्ड ठेवणे : असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे अटकेसारख्या पोलीस कारवायांच्या नोंदी ठेवतात. तसंच ते आपल्यापेक्षा उच्च रँकच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यासाठी अहवाल तयार करतात.

प्रशिक्षण : असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे नव्याने भरती झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.