ATM मधून पैसे काढताना अनेकदा फाटलेल्या नोटा येतात अशावेळी ग्राहकांसमोर अडचण निर्माण होते. या फाटलेल्या नोटा अलिकडे कोणीच घेत नाही त्यामुळे अनेकांना आपले पैसे फुकट गेले असेही वाटते. पण आता तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. ATM मधून जर अशा फाटलेल्या नोटा आल्या तर तुम्ही अगदी सहज या नोटा बदलून घेऊ शकता यामुळे ग्राहकांना नुकसानही होणार नाही.
( हेही वाचा : SBI अॅपद्वारे करा स्वस्तात रेल्वे तिकिटांची बुकिंग! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)
ATM मधून आलेल्या फाटलेल्या नोटा कशा बदलायच्या?
- ATM मधून फाटलेल्या नोटा आल्या तर त्या बदलण्यासाठी तुम्हाला ज्या बॅंकेचे ATM आहे त्या संबंधित बॅंकेकडे अर्ज करावा लागेल.
- अर्ज करताना तुम्ही वार, वेळ, तारीख, ठिकाण इत्यादी गोष्टी आवर्जून नमूद करा. यानंतर तुम्हाला पैसे काढताना आलेली स्लिप या अर्जासह जोडावी लागेल. तुम्ही स्लिप घेतली नसेल तर मोबाईल आलेला मेसेज सुद्धा तुम्ही संबंधित बॅंकेत दाखवू शकता.
- RBI च्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोणत्याही सरकारी बॅंका नोटा बदलून देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आता फाटलेल्या नोटा सहज बदलता येणार आहेत या प्रक्रियेला जास्त वेळही लागणार नाही.
- यासंदर्भात ट्विटरवर एका ग्राहकाने तक्रार केली होती. या तक्रारीवर स्पष्टीकरण देताना SBI ने म्हटले आहे की, आम्ही ATM मध्ये नोटा लोड करण्यापूर्वी त्या अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशिनद्वारे तपासूनच घेतो. त्यामुळे सहसा ग्राहकांना फाटलेल्या नोटा मिळत नाहीत. तरीदेखील चुकून फाटलेली नोट आली तर तुम्ही बॅंकेच्या शाखेतून सहज बदलून घेऊ शकता.
SBI बॅंकेतून फाटलेली नोट आल्यास कुठे करावी तक्रार?
https://crcf.sbi.co.in/ccf/ या वर तुम्ही तक्रार करू शकता. ही लिंक फक्त स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. कोणतीच बॅंक ग्राहकांना एटीएममधील फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. एटीएममधून आलेल्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई किंवा १० हजारपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
Join Our WhatsApp Community