-
ऋजुता लुकतुके
एकीकडे कार उत्पादक कंपन्या पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेल्या कारकडे वळताना दिसत आहेत. दुसरीकडे, बाजारात हायब्रीड कारची चलती दिसत आहे. बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिझ या जर्मन कंपन्या मात्र या कात्रीत सापडलेल्या नाहीत. त्यांनी गेली काही वर्षं फक्त इलेक्ट्रिकवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. या तीन कंपन्यांमध्ये सगळ्यात उशिरा इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आलेली कंपनी ऑडीने त्यानंतर मात्र आपल्या क्यू मालिकेतील कार इलेक्ट्रिक प्रकारात आणण्याचा सपाटाच लावला आहे. यात नवीन भर पडलीय ती क्यू६ ई-ट्रॉन (Audi Q6 E-TRON). प्रिमिअम लक्झरी श्रेणीतील ही कार म्हणजे कामगिरी, शक्ती, तंत्रज्जान आणि राजेशाही दिमाख तसंच थाट यांच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे. आताच या गाडीचं वर्णन यावर्षीच्या सर्वोत्तम कारपैकी एक असं केलं जातंय.
गाडीचा लुक पारंपरिक ऑडी कारहून निश्चितच वेगळा आहे. पण, पुढे असलेलं ग्रिल मात्र ऑडीची ओळख पटवून देणारं आहे. अष्टकोनी हे ग्रिल कंपनीने बदलेललं नाही. बाकी एलईडी दिवे आणि स्पोर्टी लुक हा पूर्णपणे नवीन आहे. आतून ही गाडी ऑडीच्या इतर गाड्यांच्या तुलनेतही जास्त राजेशाही आहे. ऑडीने आपल्या या गाडीच्या पुढच्या भागाला कॉकपिट असं नाव दिलं आहे. आणि या भागात आहे चालकासमोर असलेला १२.३ इंचांचा कॉकपिट डिस्प्ले आणि मधोमध असलेला १५ इंचांचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले. ॲपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो यांना हा डिस्प्ले ब्लूटूथने जोडला जाऊ शकतो. तर गाडीत एमएमआय हे दिशादर्शक नॅव्हिगेशन टूलही बसवण्यात आलं आहे. कुठल्याही वातावरणात आणि हवामानात गाडीच्या आत पुरेसा प्रकाश असेल अशी काळजी डिझायनिंगमध्ये घेण्यात आली आहे. तर गाडीतील तापमानही बाहेरच्या वातावरणाप्रमाणे आपोआप बदलू शकतं. तशी यंत्रणा आत बसवण्यात आली आहे. (Audi Q6 E-TRON)
(हेही वाचा – Donald Trump : ‘या’ ४१ देशाच्या लोकांना अमेरिकेत प्रवेश बंदी ; काय आहे ‘ट्रॅव्हल बॅन’ ?)
A statement of power, innovation, and timeless design. The all-new Audi Q6 e-tron in Mythos Black.#audi #qatar #qauto #Q6 #etron pic.twitter.com/nTl94Oj4oo
— AUDI QATAR (@AudiQatar1) March 10, 2025
गाडीत ७७ केडब्ल्यूएच क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. आणि यामुळे संपूर्ण चार्ज केलेली गाडी सलग ४५० किमींपर्यंत जाऊ शकेल. तर गाडीत ५०० एचपी इतकी शक्तीही निर्माण होऊ शकेल. शून्य ते शंभर किमी प्रती तासांचा वेग ही गाडी फक्त साडेचार सेकंदांत गाठू शकेल. शिवाय गाडीतील बॅटरी फक्त अर्ध्या तासात ८० टक्के चार्ज होऊ शकेल. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी ही गाडी अगदी योग्य आहे. (Audi Q6 E-TRON)
कुठल्याही रस्त्यांवर ही गाडी सारख्याच क्षमतेनं काम करू शकेल. ऑडी क्यू८ ई-ट्रॉन (Audi Q6 E-TRON) गाडी प्रिमिअर श्रेणीतील असल्यामुळे तिची किंमत १ कोटी रुपयांपासून सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community