कोणाचं नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. आजच्या या सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या आधुनिक युगात तुमची एखादी गोष्ट ’क्लिक’ झाली तर जणू पैशांचा पाऊस पडू शकतो. ऑस्टिन स्टॅनली या डिलिवरी बॉयची अशीच कहाणी आहे. ऑस्टिन स्टॅनली हा अतिशय सामान्य माणूस आठवड्याचे ६ दिवस तो डिलिवरी बॉय म्हणून काम करत होता आणि सुट्टीच्या दिवशी रील्स बनवायचा. म्हणजे तो कधीही सुट्टी घ्यायचा नाही. गंमत म्हणून रील्स बनवायला सुरुवात केली आणि त्याचे नशीब फळफळले.
मूळ केरळचा आणि मुंबईत लहानाचा मोठा झालेल्या या तरुणाने इंडियन शॉर्ट व्हिडिओ ऍप्लिकेशन Moj वर विनोदी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. त्याचे सुरुवातीच्या काही व्हिडियोजला चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याचे Moj वर २२ लाख फॉलोवर्स आहेत. सुट्टीचा दिवस सार्थकी लावावा म्हणून सुरु केलेले रील्स आता त्याच्या कमाईचं साधन झालं आहे.
(हेही वाचा महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
या तरुणाने व्हिडिओ विनोदी असतात. प्रेम हा त्याच्या व्हिडिओचा मुख्य विषय असतो. सुरुवातीला त्याने एका मुलीसोबत रील्स बनवले तेव्हा लोकांनी त्याची मस्करी केली. तू त्या मुलीचा बाप दिसतोस असं म्हटलं. पण ही नेगेटिव्ह पब्लिसिटी त्याने ओळखली आणि त्याला वाटलं की लोक आपल्याला पाहू लागले आहेत. मग तो थांबला नाही. तो सत रील्स बनवत गेला आणि आता तो सोशल मीडिया स्टार झालेला आहे.
Join Our WhatsApp Community