उन्हाळा सुरू झाला की, सर्वांना आंब्याची चाहूल लागते. कोकणचा हापूस आंबा म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय! आंबा केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेकजण जेवणासोबत आंब्याचे सेवन करतात. परंतु आंबा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. कारण आंब्यावर हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
( हेही वाचा : ऑनलाइन फूड ऑर्डर करताय? मग आता उपाशीच रहा! )
या पदार्थांचे सेवन करू नका
पाणी – आंबा खाल्ल्यावर किमान अर्धा तास पाणी पिऊ नये, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे पोटदुखी, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
कारले- आंबा खाल्ल्यानंतर कारली कधीही खाऊ नयेत. अन्यथा तुम्हाला मळमळ, उलट्या आणि श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात.
मसालेदार अन्न- आंबा खाल्ल्यानंतर कधीही मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. असे केल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. तसेच, त्वचेवरही वाईट परिणाम होतो.
कोल्ड्रिंक्स – आंब्यामध्ये गोडाचे प्रमाण जास्त असते. अशात जर तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक्सचे सेवन केले तर तुमच्या शरीरात साखरेची पातळी वाढू शकते.
दही- आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नये. कारण, आंबा आणि दही मिळून पोटात कार्बन डायऑक्साइड तयार होतो.
Join Our WhatsApp Community