-
ऋजुता लुकतुके
अदानी उद्योग समुहाने अलीकडे समुहातील कंपन्यांमधली हिस्सेदारी कमी करून रोखता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या आठवड्यात त्यांनी शेअर बाजाराला कळवलं की, ते अदानी विल्मरमधून १३.५१ टक्के हिस्सा काढून घेणार आहेत. या बातमीनंतर अदानी विल्मरच्या शेअरची या आठवड्यात मोठी पडझड झाली आहे. इतकंच नाही तर हिंडेनबर्ग कंपनी बंद होणार असल्याच्या बातमीनंतर गुरुवारी (१६ जानेवारी) इतर अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर वर चढले. तेव्हाही अदानी विल्मर सुस्तच होता. शुक्रवारी आठवडा बंद होताना अदानी विल्मरचा शेअर दीड टक्क्यांनी खाली येऊन २४५ रुपयांवर बंद झाला. गेल्यावर्षी फेब्रुवारीत या शेअरने ४०८ रुपयांचा वार्षिक उच्चांक नोंदवला होता. त्या स्तरापासून शेअर आता २४ टक्के घसरला आहे. (AWL Share Price)
(हेही वाचा- Saif ali khan वर हल्ला करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात; ठाण्यातून अटक)
तर गेल्या महिन्याभरात शेअर १२ टक्क्यांनी घसरला आहे. जेव्हा कंपनीची प्रमोटर संस्थाच कंपनीतून हिस्सा विकते, तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये असा समज पसरतो की, प्रमोटरनाच कंपनीच्या कामगिरीवर विश्वास नाही. ही नकारात्मकता सध्या शेअरमध्ये दिसत आहे. (AWL Share Price)
अदानी समुहातील खाद्यतेल कंपनी अदानी विल्मरने गेल्यावर्षी ओंकार केमिकल्स कंपनीतील ६७ टक्के हिस्सेदारी विकत घेतल्यानंतर हा शेअर खरंतर तेजीत होता. दोन्ही कंपन्यांदरम्यान यासाठी आवश्यक कागदोपत्री व्यवहार झाले असून ओंकार केमिकल्समधील या हिस्सेदारीचं मूल्य ५६ कोटी रुपये इतकं असल्याची अदानी विल्मर कंपनीने शेअर बाजारात लेखी कळवलं आहे. (AWL Share Price)
(हेही वाचा- Dhananjay Munde यांना पालकमंत्रीपदावरून डच्चू ; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले …)
अदानी आणि सिंगापूरचा विल्मर उद्योग समुह यांच्या भागिदारीने उभी राहिलेली ही कंपनी देशातील प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. खाद्यतेल, कणीक, डाळी, बेसन आणि साखर यासारख्या वस्तू ही कंपनी सध्या वितरित करते. ओंकार केमिकल्सच्या शेअर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्यासाठी ३ ते ४ महिने वेळ अपेक्षित आहे. (AWL Share Price)
ओंकार केमिकल्स ही कंपनी साबण, शाई, डिंक यामध्ये वापरण्यात येणारा सरफॅक्टन्ट हा रासायनिक घटक बनवते. आणि अदानी विल्मर कंपनीला आपल्या ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी या घटकाची गरज पडते. आतापर्यंत हा घटक ते बाहेरून विकत घेत होते. पण, ओंकार केमिकल्सच्या हिस्सेदारीनंतर त्यांना सरफॅक्टंटचा पुरवठा नियमितपणे सुरू होईल. (AWL Share Price)
ओंकार केमिकल्समधील गुंतवणुकीनंतर अदानी विल्मर कंपनीला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात विस्ताराला मोठी मदत होणार आहे. (AWL Share Price)
(हेही वाचा- Saif Ali Khan हल्ला प्रकरण-छत्तीसगड मधून एक जण ताब्यात)
सध्या अदानी समुह विल्मर या आपल्या सिंगापूरमधील भागिदार कंपनीकडून काही रासायनिक घटक भारतात आयात करतो. हे परावलंबन आता कमी होईल. आणि कंपनीच्या शेअरवरही याचा परिणाम येत्या दिवसांमध्ये दिसू शकेल. (AWL Share Price)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. आणि गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरविषयी कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community