baby food: सॅरलॅक नको! आता घरच्या घरीच बनवा बाळाचा पौष्टिक आहार

316
baby food: सॅरलॅक नको! आता घरच्या घरीच बनवा बाळाचा पौष्टिक आहार
baby food: सॅरलॅक नको! आता घरच्या घरीच बनवा बाळाचा पौष्टिक आहार

आपल्या बाळासाठी योग्य पोषक जीवनसत्त्वे (baby food) मिळण्याची चिंता प्रत्येक आईंच्या मनात घर करून असते. जन्मानंतरच्या ६व्या महिन्यापासुन साधारणपणे मुलं आईच्या दुधाव्यतिरीक्त इतर खाद्यपदार्थ खाण्यास सुरूवात करतात. बाळाचं पोट हे इतर प्रकारचं वेगवेगळं अन्न पचवण्यासाठी तेवढं सक्षम नसतं. आईच्या दुधातून बाळाला पुरेसं पाणी मिळतं. सुरुवातीला सेवन केलेल्या दुधाने बाळाची भुक भागते आणि नंतर त्याचं पोट भरून बाळ तृप्त होतं. त्यामुळं सहा महिने केवळ आईचं दूधच द्यावं. (baby food)

(हेही वाचा – कधी झाली होती WHO ची स्थापना आणि काय आहेत उद्दिष्ट्ये?)

सहा महिन्यानंतर बाळाची वाढ, प्रतिकार शक्ती, अवयव यांची वेगाने वाढ सुरू होते. मुलं रांगु लागतात. त्यामुळं त्याची ऊर्जा खर्च होऊ लागते. बाळाला स्वाद समजायला लागतो. त्यानंतरही आईचंच दूध पुरेशा प्रमाणात देत राहिलं तर बाळ इतर गोष्टी खाणं टाळतं, यामुळे बाळाला योग्य वेळेतच खाद्यपदार्थ (baby food) देण्यास सुरूवात करावी. आज बाजारात मिळणारे बेबी फूड हे प्रिझर्व्हेटिव्ह्सने (preservatives) भरलेले आहेत. पण, तुम्ही तुमच्या बाळासाठी घरी जे अन्न तयार करू शकता तेवढे ते पौष्टिक नसतात. घरी बनवलेले अन्न हे अत्यंत पौष्टिक तर असतेच पण योग्य प्रकारे बनवले तर ते बाळाच्या योग्य विकासास मदत करू शकते. (baby food)

(हेही वाचा – Lok Sabha election 2024 : 95 वर्षाच्या आजोबांनी केले मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन)

ताज्या भाज्या आणि फळांमध्ये सर्वाधिक पोषक घटक असतात. सेंद्रिय पद्धतीने (Organic methods) पिकवलेल्या भाज्या आणि फळे खरेदी करा. फळांची प्युरी करून मुलांना पाजल्याने तुमचे बाळ सुदृढ होईल. सुरुवातीला पूरक आहार म्हणून मऊ शिजलेल्या तांदळाचे पदार्थ देऊ शकता. त्याबरोबर चवीसाठी दूध, दही, गूळ, मध, तूप, तेल यांचा वापर करता येऊ शकतो. (baby food)

घरच्याघरी बेबी फूड बनवण्याच्या काही सोप्या पद्धती :

१. तांदूळ व्यवस्थित धुवून सर्व पाणी काढून टाकावे. स्वच्छ टॉवेलवर धुतलेले तांदूळ पसरवा आणि पूर्णपणे कोरडे होऊ द्या. आता एका भांड्यात ४ चमचे मूग डाळ, ४ चमचे मसूर डाळ, ओवा आणि ७ बदाम टाका. सर्वकाही चांगले धुवा आणि जास्तीचे पाणी काढून टाका. स्वयंपाकघरातील टॉवेलवर सर्व साहित्य पसरवा आणि सर्व साहित्य पूर्णपणे कोरडे होऊ द्या. आता एका कढईत वाळलेल्या डाळी घाला आणि सुवासिक होईपर्यंत कोरड्या भाजून घ्या. आता भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून ग्राइंडरमध्ये मिसळून बारीक पावडर बनवा. बनवलेली १ चमचा पावडर १ कप पाण्यात ८-१० मिनिटे किंवा किंचित घट्ट होईपर्यंत शिजवा.

२. केळी सोलून त्याचे लहान तुकडे करा. अर्धा कप पाण्यासह ब्लेंडरमध्ये तुकडे घाला. बाळासाठी प्युरीमध्ये तुम्ही पाण्याऐवजी दुधही घालू शकता.

३. १ लहान गाजर सोलून त्याचे लहान तुकडे करा. गाजराचे तुकडे एका पॅनमध्ये १/२ कप पाण्यासह घाला. 10-12 मिनिटे शिजवा आणि थोडे थंड होऊ द्या.गाजर पाण्यासह ब्लेंडरमध्ये एकत्रित करून त्याची प्युरी तयार करा. ही गाजर प्युरी लहान मुलांसाठी उपयुक्त आहे.

सर्व साधारणपणे घरांमध्ये बाळासाठी अशाप्रकारचा आहार बनवला जातो. बाळाचे आरोग्य, ऋतु यांनुसार बाळाचा आहार ठरवावा.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.