घरात लहान बाळ आलं की अगदी आनंदाचं वातावरण असतं. बालकृष्ण घरात रांगू लागला की अख्खं घर सुखात न्हाऊन जातं. त्याच्या बोबड्या बोलाने घरात जणू एक सुरेल नाद घुमू लागतो. त्यात बाळ ही मुलगी असेल तर घरात लक्ष्मीच आली म्हणा ना… मुलगी म्हणजे बाबांचा जीव की प्राण… अशा गोडुल्या मुलीला आपण अनेक टोपण नावाने हाक मारतो. (Baby Girl Names In Marathi)
पण आपल्या मुलीचं एक छान आणि सुंदर नाव असावं, सध्या युनिक नावे ठेवण्याची फॅशन आहे. लोक वेगवेगळ्या नावांचा पर्याय आता निवडू लागले आहेत. यामी गौतम या हिंदीतल्या अभिनेत्रीने तिच्या मुलाचं नाव वेदाविद असं ठेवलं आहे. म्हणजे वेद जाणणारा. इतकं सुंदर नाव शोधून काढल्याबद्दल तिचं अभिनंदनच करायला हवं. (Baby Girl Names In Marathi)
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या विषयावरील कोट्स!)
नाव ठेवताना कोणती काळजी घ्याल?
१. नाव ठेवण्याआधी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की ते नाव आपल्याला स्वतःला उच्चारता येतं का?
२. निलेशचं निल्या, शैलेशचं शैल्या अशी फोड होते अशाप्रकारचं विदृपीकरण तुमच्या मुलीच्या नावाला प्राप्त होता कामा नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे.
३. मुलगी मोठी झाल्यावर तिला हे नाव शोभेल का? याचाही पूर्व विचार करायला हवा.
४. सध्या न्यूमरॉलॉजी डंका वाजतोय. त्यामुळे तुम्ही ठेवलेलं नाव न्यूमरॉलॉनुसार योग्य आहे का, हे तसापा.
५. आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ समजून घ्या. उगाच वेगळं नाव ठेवायचं आहे म्हणून अर्थहीन नाव ठेवू नका.
६. नाव ठेवताना तुमच्या कुटुंबाचा इतिहास, प्रतिष्ठा यांचाही विचार करु शकता. तुमच्या कुटुंबाला शोभेल असे नाव ठेवी शकता.
७. पराक्रमी किंवा कर्तृत्ववान पूर्वजांच्या नावावरुन नाव ठेवू शकता.
८. मुलीचं नाव ठेवताना सबंध कुटुंबाला विश्वासात घ्या. कारण वर म्हटल्याप्रमाणे कुणीही चुकीचं नाव उच्चारू नये.
९. देवीच्या नावावरुनही तुमच्या मुलीचं नाव तुम्ही ठेवू शकता.
१०. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या नावावरून नाव ठेवल्याने आपल्या भारतीय परंपरेची आठवणही होते. तसेच बाहेरच्या देशातल्या विशेषतः आक्रमकांच्या नावावरुन आपल्या मुलीचे नाव मुळीच ठेवू नका.
तर वाचकांनो, या माहितीद्वारे तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव ठेवण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन मिळाले असेल. मग तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीचे नाव काय ठेवणार आहात? आम्हाला नक्की कळवा. (Baby Girl Names In Marathi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community