badrinath : बद्रीनाथ मंदिराची संपूर्ण माहिती आता मराठीमध्ये, वाचा फक्त इथेच…

191
badrinath : बद्रीनाथ मंदिराची संपूर्ण माहिती आता मराठीमध्ये, वाचा फक्त इथेच...

बद्रीनाथ हे प्रसिद्ध शहर भारतातील उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले आहे. इथले बद्रीनाथ मंदिर म्हणजे चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून सरासरी ३,३०० मीटर (१०,८२७ फूट) उंचीवर आहे. (badrinath)

कोणी केली मंदिराची स्थापना?

असं म्हटलं जातं की या मंदिराची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली आहे. या मंदिरात भगवान विष्णूची १ मीटर उंच काळ्या दगडाची मूर्ती आहे, जी विष्णूच्या ८ स्वयंभू मूर्तींपैकी एक मानली जाते. इथले वातावरण अतिशय पवित्र असल्यामुळे लाखो यात्रेकरू, पर्यटक भक्त दरवर्षी येथे येतात. (badrinath)

कसे आहे मंदिर?

बद्रीनाथ मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार रंगीबेरंगी आणि आकर्षक आहे. हे मुख्य द्वार सिंहद्वार म्हणून ओळखले जाते. बद्रीनाथ मंदिराच्या गेटवर, देवाच्या मुख्य मूर्तीसमोर, भगवान बद्रीनारायण यांचे वाहन म्हणजेच गरुडाची मूर्ती विराजमान आहे. गरुड बसून हात जोडून प्रार्थना करताना दिसतो. (badrinath)

मंदिर सुमारे ५० फूट उंच आहे. बद्रीनाथ मंदिरात तप्त-कुंड आहे. खरंतर हा गरम पाण्याचा झरा आहे. हा झरा जो औषधीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. अलकनंदा नदीचा उगम इथूनच होतो. मंडपाच्या भिंती आणि खांब कोरीव कामांनी मढवलेले आहेत.

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय)

बद्रीनाथ मंदिराचा इतिहास :

बद्रीनाथ हे नाव बद्री या स्थानिक शब्दापासून पडले आहे. बद्री एक प्रकारचे वन्य बोरं आहे. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान विष्णू या पर्वतांमध्ये तपश्चर्येला बसले होते तेव्हा त्यांची पत्नी देवी लक्ष्मीने बोराच्या वृक्षाचे रूप धारण केले आणि कडक उन्हापासून त्यांचे रक्षण केले. (badrinath)

स्कंद पुराणानुसार, भगवान बद्रीनाथाची मूर्ती आदिगुरु शंकराचार्यांनी नारद कुंडातून मिळवली आणि इसवी सनाच्या ८ व्या शतकात या मंदिरात पुन्हा स्थापित केली. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माची प्रतिष्ठा पुन्हा स्थापित केली. त्यामुळे या मंदिराला देखील विशेष महत्व प्राप्त झाले आहे. इथे केवळ सामान्य भक्तगण नव्हे तर अनेक साधू, संत तपश्चर्येसाठी येतात.

बद्रीनाथ मंदिरात कसे पोहोचाल?
  • हेलिकॉप्टरद्वारे :

डेहराडून आणि दिल्ली ते बद्रीनाथ येथे हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकर या मंदिरात पोहोचायचे असेल तर तुम्ही हेलिकॉप्टरद्वारे जाऊ शकता.

  • कार/बस :

तुम्ही बेंगळुरूहून बद्रीनाथला बसने जाऊ शकता. हे अंतर अंदाजे १,६५८ किमी आहे आणि कारने प्रवास करण्यासाठी सुमारे ४२ तास लागू शकतात. एनएच५२ आणि एनई४२ मार्गाने जाता येते.

  • ट्रेन :

बद्रीनाथला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे, बद्रीनाथपासून सुमारे २९० किमी अंतर असल्यामुळे तुम्हाला या स्टेशनला उतरले पाहिजे.

  • टॅक्सी/बस :

ऋषिकेशहून, तुम्ही बद्रीनाथला जाण्यासाठी बस पकडू शकता किंवा टॅक्सी भाड्याने घेऊ शकता.

  • विमान :

बद्रीनाथचे सर्वात जवळचे विमानतळ डेहराडूनमधील जॉली ग्रॅंट विमानतळ आहे, मंदिरापासून सुमारे ३११ किमी अंतरावर आहे. (badrinath)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.