Bajaj Auto Price : बजाज कंपनीने गेल्यावर्षी देशातील पहिली सीएनजी बाईक रस्त्यावर आणली आहे

Bajaj Auto Price : अलीकडेच कंपनीने बजाज फ्रीडम या बाईकच्या किमती कमी केल्या आहेत.

38
Bajaj Auto Price : बजाज कंपनीने गेल्यावर्षी देशातील पहिली सीएनजी बाईक रस्त्यावर आणली आहे
  • ऋजुता लुकतुके

बजाज कंपनीने गेल्यावर्षी सीएनजी या तुलनेनं स्वस्त इंधनावर आधारित बाईक निर्मिती करून दुचाकींच्या क्षेत्रात धमाल उडवून दिली होती. फ्रीडम १२५ या बाईकच्या किमतीत आता कंपनीने १०,००० रुपयांपर्यंतची सवलत देऊ केली आहे. बाईकच्या दोन प्रकारांच्या किमती सध्या कंपनीने कमी केल्या आहेत. ड्रम हे कंपनीचं मूलभूत मॉडेल आता ९०,००० रुपयांना उपलब्ध असेल. तर ड्रम एलईडी ही बाईक आता ९४,००० रुपयांना मिळेल. (Bajaj Auto Price)

(हेही वाचा – Nagpur जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमध्ये ॲल्युमिनियम कारखान्याचा स्फोट, ५ ठार)

५ महिन्यांपूर्वीच बजाज कंपनीने या बाईक भारतात लाँच केल्या होत्या. यापैकी ड्रम एलईडीची किंमत ही १०,००० रुपयांनी कमी झाली आहे. फ्रीडम बाईकमध्ये १२५ सीसी क्षमतेचं इंजिन आहे. त्याची सीएनजी इंधनाची टाकी ही २ किलोंची आहे. सीएनजी इंधनावर आधारित बाईकचे दोन फायदे आहेत. हे इंधन इतर इंधनांच्या तुलनेत स्वस्त आहे. या इंधनावर चालणारी गाडी एका किलोमागे १०२ किलोमीटर चालू शकते. पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या गाड्या जास्तीत जास्त ६२ किलमीटरचं मायलेज देतात. त्यामुळे एकदा खरेदी केल्यानंतर फ्रीडम गाडी चालवण्याचा खर्च एकदम निम्मा होतो, असा कंपनीचा दावा आहे. (Bajaj Auto Price)

(हेही वाचा – France चे संरक्षण मंत्री भारतात येणार; भारतीय हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी करार होणार)

खिशाला स्वस्त आणि वर काहीसा जास्त पर्यावरणपूरक पर्याय म्हणून बजाज कंपनीने ही बाईक आणली आहे. पण, सीएनजी इंधनाच्या २ किलो टाकीच्या बरोबरीने यात २ लीटरची पेट्रोलची टाकीही आहे. या दोन्ही भरलेल्या असल्या की, गाडीचं वजन एकदम वाढतं. इतर बाईकच्या तुलनेत ही गाडी पेलायला वजनदार आहे. आता कंपनीने या बाईकवर दिलेली सवलत ही नेमकी कोणत्या कारणामुळे दिली हे अजून समजू शकलेलं नाही. पण, वर्षात तयार असलेला माल संपवावा आणि नवीन उत्पादन सुरू करता यावं यासाठी ही सवलत दिली असावी असा जाणकारांचा अंदाज आहे. खासकरून महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत फ्रीडम बाईकची चांगली विक्री कंपनीने केली आहे. लाँच झाल्यानंतर सहा महिन्यात जवळ जवळ ५०,००० बाईक विकल्या गेल्या आहेत. यातील १९ टक्के विक्री ही महाराष्ट्रात झाली आहे. (Bajaj Auto Price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.