-
ऋजुता लुकतुके
बजाज समुहातील कन्झ्युमर केअर क्षेत्रातील कंपनी बजाज कन्झ्युमर केअर लिमिटेडला या आठवड्यात शेअर बाजारात चांगलाच मार बसला आहे. एमएमसीजी म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपनीची मुख्य उत्पादनं आहेत विविध प्रकारची तेलं, मलमं आणि गुलाब जल तसंच केसांची निगा राखणारी काही उत्पादनंही ही कंपनी बनवते. पण, डिसेंबर २०२४ तिमाहीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीची शेअर बाजारात घसरण झाली आहे. (Bajaj Consumer Share Price)
मागच्या आठवडाभरात बजाज कन्झ्युमर केअर लिमिटेड कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी खाली आला आहे. तर शुक्रवारी हा शेअर साधारण १ टक्क्यांच्या किंवा १.४५ अंशांच्या घसरणीसह १५७.४० वर बंद झाला आहे. कंपनीचं भाग भांडवल हे २१२३ कोटी रुपयांचं आहे. पण, सलग दोन तिमाही निकालांमध्ये घसरलेला कंपनीचा ताळेबंद सध्या या शेअरला त्रास देतो आहे. पण, आयसीआयसीआय सेक्युरिटीज या संशोधन संस्थेनं या कंपनीला अजूनही सकारात्मक रेटिंग दिलं आहे. (Bajaj Consumer Share Price)
(हेही वाचा – “पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय हुशार व्यक्ती”; Donald Trump यांनी प्रशंसा करत आयात शुल्काबाबत दिला इशारा)
आयसीआयसीआय सेक्युरिटीजनी बजाज कन्झ्युमरचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. फक्त लक्ष्य २४० रुपयांवरून कमी करून ते २२० रुपयांवर आणलं आहे. मागची काही वर्षं आयसीआयसीआयकडून या शेअरचा अभ्यास केला जात आहे. त्याला अनुसरून कंपनीने हा सल्ला दिल्याचं अहवालात म्हटलं आहे. कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर हा शेअर घसरतोय. (Bajaj Consumer Share Price)
कंपनीचा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी घसरला आहे. तर घाऊक बाजारातील उत्पादनांचा खप कमी झाल्याचं निरीक्षण तिमाही ताळेबंदातून समोर येत आहे. कंपनीने उत्पादनं भारतभर पोहोचवण्यासाठी विस्ताराचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुरुवातीला शहरातील नवीन जिल्हे आणि ग्रामीण भागातील काही जिल्हे आरोहण प्रकल्पा अंतर्गत काबीज केले जाणार आहेत. त्यानंतर संपूर्ण भारतभर उत्पादनं पोहोचावीत यासाठी प्रयत्न होणार आहे. या रणनीतीवर भरवसा ठेवून कंपनीचे निकाल हळू हळू सुधारतील अशी आशा बाजारातील तज्ज मंडळींना आहे. (Bajaj Consumer Share Price)
शिवाय कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि कमी झालेला पुरवठा यांचा ताण मागील तिमाहीत कंपनीला बसल्याचंही निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळासाठी जाणकार या शेअरमध्ये आश्वासक आहेत. ५० टक्क्यांची वाढ या शेअरमध्ये त्यांना अपेक्षित आहे. (Bajaj Consumer Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी अथवा विक्रीचा कुटलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community