bams colleges in maharashtra : BAMS अभ्यासक्रम म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट BAMS कॉलेज कोणते आहेत?

186
अन्य राज्यातील BAMS पदवीधारकांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात कोट्यातून संधी मिळणार
काय आहे BAMS?

BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी होय. ही भारतातली एक वैद्यकीय पदवी आहे. ही पदवी मिळवण्यासाठी बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून मग पुढे साडेपाच वर्ष ही पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. या साडेपाच वर्षांमध्ये एका वर्षाच्या इंटर्नशिपचाही समावेश आहे. BAMS ही पदवी मिळवणारी व्यक्ती भारतात कुठेही आपल्या कामाची प्रॅक्टिस करू शकते. (bams colleges in maharashtra)

BAMS या पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये शरीरशास्त्र, औषधशास्त्र, औषधांचे गुणधर्म, रोगप्रतिबंधकं, विषशास्त्र, न्यायवैद्यक, नाक-कान-घसा यांची औषधं तसेच अर्वाचीनवैद्य आणि आधुनिक वैद्य यांचा समावेश होतो. यामध्ये आयुर्वेदिक वैद्यकीय शास्त्राचं अध्ययन केलं जातं. काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते BAMS आणि MBBS या दोन्ही वेगवेगळ्या पदव्यांचा अभ्यास एकत्रितपणे केला जाऊ शकतो. (bams colleges in maharashtra)

आयुर्वेदाचं महत्त्व

आयुर्वेदिक उपचार पद्धतीला भारतापेक्षा परदेशात जास्त महत्त्व दिलं जातंय. सध्या आयुर्वेदिक औषधं उत्पादन कंपन्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. आयुर्वेदातली एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर परदेशातल्या आयुर्वेदिक औषधोपचाराची लोकप्रियता पाहता, भारतात ठिकठिकाणी पर्यटकांसाठी आयुर्वेदिक उपचार केंद्रे आणि पंचकर्म केंद्रे उभारण्यात आली आहेत. कालांतराने भारतातही लोक पुन्हा आयुर्वेदिक उपचार पद्धतींकडे वळत आहेत. कारण आयुर्वेदिक उपचाराने शरीराला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. आयुर्वेदिक औषधांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इतर लोकांनाही या क्षेत्रात नवनवीन कामं करण्याची संधी मिळत आहे. (bams colleges in maharashtra)

हल्ली भारतातल्या प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कमीतकमी एक तरी आयुर्वेदिक डॉक्टर असणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे आयुर्वेद शास्त्राची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. IASI युनिव्हर्सिटीचे कुलगुरू मिलाप दुगर म्हणतात की, ‘आयुर्वेद शास्त्र ही एक अनोखी वैद्यकीय प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये फक्त आजार बरे केले जात नाहीत. तर त्या विशिष्ट व्यक्तीवर पंचकर्म उपचार देखील केले जातात.’ या पंचकर्म उपचार पद्धतीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आयुर्वेदाचार्य पदवी असलेल्या डॉक्टरांची मागणी वाढली आहे. (bams colleges in maharashtra)

BAMS चा अभ्यासक्रम

भारतात आयुर्वेद शास्त्राचं शिक्षण सेंट्रल काऊंन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन म्हणजेच CCIM यांच्याद्वारे नियंत्रित केलं जातं. आयुर्वेद शास्त्रामध्येतम साडेपाच वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्यानंतरच बॅचलर ऑफ मेडिसिन अँड सर्जरी म्हणजे BAMS पदवी दिली जाते. भारतामध्ये आयुर्वेदिक महाविद्यालये पदवी स्तरावर आयुर्वेदाचार्य किंवा BAMS ची पदवी देतात. (bams colleges in maharashtra)

त्यासाठी विद्यार्थ्यांची किमान पात्रता उच्च माध्यमिक/पीयूसी शक्यतो संस्कृत भाषेसह किंवा समतुल्य किंवा माध्यमिक आयुर्वेदिक गट- जसे की, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि संस्कृत परिषदेचे निकष कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेली हवे. BAMS च्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचं वय कमीतकमी सतरा वर्षं एवढं असायला हवं. (bams colleges in maharashtra)

(हेही वाचा – Maratha Reservation: मनोज जरांगेंनी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणे यांना सुनावलं!)

BAMS चं शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी पुढे दिली आहे.
  • आर.ए. पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेज, वरळी

हे मुंबईतील वरळी भागात असलेलं कॉलेज आहे. इथे तुम्ही BAMS चा संपूर्ण अभ्यासक्रम शिकू शकता. हे कॉलेज आणि हॉस्पिटल १९४१ साली श्री. पोदार यांच्या देणगीतून सरकारने बांधले आहे. (bams colleges in maharashtra)

  • आयुर्वेद महाविद्यालय, सायन

हे आयुर्वेदिक प्रसारक मंडळातर्फे बांधलं गेलेलं कॉलेज आणि हॉस्पिटल आहे. हे सायन पश्चिम रेल्वे स्टेशनच्या शेजारीच उभारलेलं आहे. या कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक मंडळ विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. असं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. (bams colleges in maharashtra)

  • YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल PG इन्स्टिट्यूट, नवी मुंबई

हे महाराष्ट्रातल्या नवी मुंबईच्या खारघर येथे असलेलं इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल चोवीस तासांसाठी खुले असते. (bams colleges in maharashtra)

  • गव्हरमेंट आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल, नांदेड

हे कॉलेज आणि हॉस्पिटल १९५६ साली नांदेड येथे बांधण्यात आलं आहे. हे महाराष्ट्रातल्या सर्वांत जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. आजही हे कॉलेज आणि हॉस्पिटल यशस्वीपणे सुरू आहे. इथे काम करणारा स्टाफ आणि इथले डॉक्टर्स खूप हिरिरीने आपलं काम करत असतात. (bams colleges in maharashtra)

  • SMBT कॉलेज आणि हॉस्पिटल, नाशिक

हे नाशिक इथलं निम्न सरकारी कॉलेज आणि हॉस्पिटल आहे. हे व्यवस्थित मेंटेन केलेलं हॉस्पिटल आणि कॉलेज आहे. इथे काम करणारा स्टाफ आणि इथले विद्यार्थी खूप चांगले आहेत. महत्वाचं म्हणजे इथे स्वच्छतेच्या बाबींचं काटेकोरपणे पालन केलं जातं. (bams colleges in maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.