Bandhan Bank Share Price : बंधन बँकेचा नफा ४२ टक्क्यांनी घटला, तरीही शेअर २.२५ टक्क्यांनी वर का?

Bandhan Bank Share Price : बंधन बँकेनं शुक्रवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले.

36
Bandhan Bank Share Price : बंधन बँकेचा नफा ४२ टक्क्यांनी घटला, तरीही शेअर २.२५ टक्क्यांनी वर का?
  • ऋजुता लुकतुके

बंधन बँक ही देशातील एक आघाडीची खाजगी बँक आहे. शुक्रवारी अगदी बाजार संपता संपता बँकेनं आपले डिसेंबर २०२४ तिमाहीचे निकाल घोषित केले आहेत आणि यातून काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत. कंपनीचा तिसऱ्या तिमाहीतील नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी कमी होऊन ४२६ कोटी रुपयांवर स्थिरावला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण ७३३ कोटी रुपये इतकं होतं. (Bandhan Bank Share Price)

या निराशाजनक आकड्यांनंतरही बंधन बँकेचा शेअर शुक्रवारी बाजार बंद होताना २.२५ टक्क्यांनी वाढून १५१ रुपयांवर बंद झाला आहे. दिवसभर या शेअरचा चढता आलेखच दिसून आला. त्याचीच कारणं समजून घेऊया. (Bandhan Bank Share Price)

(हेही वाचा – Union Budget 2025 : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा अर्थसंकल्प – अशोक चव्हाण)

New Project 2025 02 01T180319.097

बँकेच्या निव्वळ नफ्यात मोठी घट झाली आहे. पण, बँकेचे निकाल बाजार संपता संपता जाहीर झाले आहेत. त्यामुळे नवीन आठवडा सुरू होताना सोमवारी या निकालांवर शेअर बाजार अधिक सजगपणे प्रतिक्रिया देऊ शकेल. पण, त्याचवेळी तिमाही निकालातून समोर आलेल्या दोन सकारात्मक गोष्टींनाही गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिलेला दिसत आहे. (Bandhan Bank Share Price)

बंधन बँकेचा एनपीए म्हणजे बुडित खाती ४.६८ टक्क्यांवर आली आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण तब्बल ७.६२ टक्के इतकं होतं. तर नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच एनआयआय तब्बल १७ टक्क्यांनी वाढून ५,४७९ कोटींवर पोहोचली आहे. याचाच अर्थ कंपनीने कर्ज वसुलीच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. (Bandhan Bank Share Price)

बंधन बँकेच्या शेअरमध्ये मागच्या ५ वर्षांत तब्बल ६५ टक्क्यांची घसरण झाली आहे आणि तेव्हापासून या शेअरमध्ये मोठे चढ उतार होत आहेत. या शेअरचा वर्षांतील उच्चांक हा गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यातील २३२ रुपये इतका होता. तर वर्षातील निच्चांकी पातळी याच वर्षी १३ जानेवारीची १३७ रुपये इतकी आहे. म्हणजेच वर्षभरात शेअरमध्ये ३७ टक्क्यांची घसरण झाली आहे. (Bandhan Bank Share Price)

(हेही वाचा – Dress Code : मंदिरातील वस्त्रसंहितेविषयी खोटा प्रचार करू नका; वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच; हिंदू जनजागृती समितीचा इशारा)

(डिस्क्लेमर-शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरमध्ये खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.