वांद्रे टर्मिनस (स्टेशन कोड: BDTS) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध रेल्वे स्थानक आहे. मुख्य मुंबई सेंट्रल स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी १९९० च्या दशकात बांधण्यात आले होते. पश्चिम रेल्वे येथे स्थित हे रेल्वे स्थानक मुंबईतील महत्त्वाचे स्थानक आहे. अगदी जलद गाड्याही इथे थांबतात. या लेखात आम्ही तुम्हाला वांद्रे टर्मिनस येथे उपलब्ध सुविधा आणि सेवांबद्दल काही तपशील देणार आहोत. (Bandra Terminus)
कनेक्टिव्हिटी :
वांद्रे टर्मिनस हे उत्तर भारत आणि पश्चिम भारतासाठी जाणाऱ्या गाड्यांसाठी महत्त्वाचे स्थानक म्हणून काम करते. मुंबई सेंट्रलवरील गर्दी कमी करण्यासाठी या स्थानकाची निर्मिती झाली असली तरी आता यास स्वतःची एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. (Bandra Terminus)
स्थानाचे महत्त्व :
वांद्रे टर्मिनस हे मुंबईतील व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षेत्र असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, तसेच मुंबई विमानतळाजवळ आहे. त्यामुळे हे व्यवसायाला जोडणारे स्थानक आहे. (Bandra Terminus)
(हेही वाचा – Bus Terror Attack : जम्मूत यात्रेकरुंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात!)
ट्रेन्स :
अनेक गाड्या वांद्रे टर्मिनस येथून सुटतात किंवा थांबतात. इथली गर्दी डोळ्यांत भरण्यासारखी आहे. बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सीद्वारे तुम्ही या स्थानकावर पोहोचू शकता. (Bandra Terminus)
वांद्रे टर्मिनस-डेहराडून एक्सप्रेस
वांद्रे टर्मिनस-भुसावळ खांदेश एक्सप्रेस
वांद्रे टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस (बरहनी मार्गे)
वांद्रे टर्मिनस-जम्मू तावी विवेक एक्सप्रेस
वांद्रे टर्मिनस-दिल्ली सराय रोहिला गरीब रथ एक्सप्रेस
या आणि अशा अनेक गाड्या इथे थांबतात.
भविष्यातील सुधारणा :
प्लॅटफॉर्मला जोडणारे एलिव्हेटेड डेक, मल्टीलेव्हल कार पार्किंग, वेटिंग एरिया, कॅफे आणि रेस्टॉरंट अशा अनेक सुविधा सुविधा प्रवाशांना लवकरच मिळणार आहेत. (Bandra Terminus)
हॉटेल्स :
विशेष म्हणजे तुम्हाला या स्थानकाच्या जवळपासच चांगले हॉटेल्स मिळू शकतात. फॅमिली, धुम्रपान रहित रुम्स, रूम सर्विस आणि २४-तास फ्रंट डेस्क यासारख्या सुविधा इथल्या हॉटेल्समध्ये मिळतात. (Bandra Terminus)
ट्रॅक्स आणि प्लॅटफॉर्म :
हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून पश्चिम रेल्वेद्वारे संचालित आहे. इथे ७ प्लॅटफॉर्म्स आणि ७ ट्रॅक्स उपलब्ध आहेत. (Bandra Terminus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community