तुमच्या सॅलरीवर लोन मिळत नाहीये? तर हे कर्ज येईल तुमच्या मदतीला

स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु सध्याच्या महागाईच्या काळात स्वत:चे घर घेणे शक्य होत नाही. अनेक वेळा असे देखील घडते की लोकांना त्यांच्या पगारावर गृहकर्ज मिळत नाही. ही समस्या टाळण्यासाठी आजकाल बॅंका संयुक्त गृहकर्ज देत आहेत. हे कर्ज दोन किंवा अधिक लोकांच्या संयुक्त बॅंक खात्याशी निगडीत असते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांसह संयुक्त गृहकर्ज घेऊ शकता.

संयुक्त गृह कर्जाचे अनेक फायदे आहेत. या कर्जासाठी अर्ज केल्याने, तुम्हाला गृहकर्ज मिळण्याची शक्यता ब-याच प्रमाणात वाढते. संयुक्त गृहकर्जाचा सर्वात चांगला फायदा म्हणजे या कर्जाचा संपूर्ण भार व्यक्तीवर पडत नाही. संयुक्त गृहकर्जासाठी सह- अर्जदाराला जोडणे फायदेशीर ठरु शकते. यामध्ये आई- वडिल, पती- पत्नी, भावंडे, मुलगा आणि अविवाहित मुलगी यांचा समावेश असू शकतो.

( हेही वाचा: ‘सावरकर विस्मृतीचे पडसाद’ आणि ‘सावरकर एक वादग्रस्त वारसा’चे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन)

या अटींवर मिळते कर्ज

या प्रकारच्या कर्जासाठी नोकरी करत असणे आवश्यक आहे. तुम्ही किमान 2 आणि कमाल 6 लोकांसह हे सहजरित्या घेऊ शकता. ज्याची सॅलरी अधिक त्याला त्यात मोठा हिस्सेदार बनवले पाहिजे हे लक्षात ठेवा. यामुळे इन्कम टॅक्समध्येही फायदा मिळू शकतो. यासोबतच तुम्ही स्टॅंप ड्युटी आणि रजिस्ट्रेशन शुल्कात सूट मिळवू शकता..

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here