Bank of Baroda SO Recruitment : बँक ऑफ बडोदा विशेष अधिकारी पदासाठी नियुक्ती सुरू

ank of Baroda SO Recruitment : एकूण १४५ रिक्त पदं भरली जाणार आहेत.

50
Bank of Baroda SO Recruitment : बँक ऑफ बडोदा विशेष अधिकारी पदासाठी नियुक्ती सुरू
  • ऋजुता लुकतुके

सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने विशेष अधिकारी पदासाठीची भरती सुरू झाल्याचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. एकूण १४६ विशेष अधिकारी (स्पेशालिस्ट ऑफिसर) निवडले जाणार आहेत. त्यासाठी देशभरातून अर्ज मागवायला सुरुवात झाली आहे. अर्ज हे ऑनलाईन प्रक्रियेनं भरायचे आहेत. तुम्ही पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्जाची मुदत २६ मार्च ते १५ एप्रिल पर्यंत आहे. (Bank of Baroda SO Recruitment)

ही १४६ पदं विविध विभागांमध्ये आहेत. यात रिलेशनशिप मॅनेजर, विमा व गुंतवणूक विभागातील अधिकारी, खाजगी बँकिंग, पोर्टफोलिओ संशोधन, आणि इतरही विशेष क्षेत्रांचा समावेश आहे. अर्जदारांनी वरील सर्व पदांमधील आपल्याला साजेसं पद आणि विभाग निवडून त्यानुसार अर्ज करायचा आहे. अर्जांच्या छाननीनंतर पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड होईल. त्यांची मुलाखत आयोजित करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे ही पदं कंत्राटी तत्त्वावर आहेत आणि सुरुवातीला ३ वर्षांचं कंत्राट उमेदवारांबरोबर करण्यात येणार आहे. या नोकर भरतीविषयीची सर्व माहिती आणि ऑनलाईन करायचा अर्ज हा www.bankofbaroda.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (Bank of Baroda SO Recruitment)

(हेही वाचा – BEML Share Price : बीईएमएल कंपनीला बंगळुरू मेट्रोकडून मोठी ऑर्डर; शेअर ३ टक्क्यांनी वधारले)

कंपनीच्या वेबसाईटवर उमेदवारांची पात्रता, निवडीची प्रक्रिया, शैक्षणिक अर्हता यांची संपूर्ण माहिती दिली आहे. हा अर्ज कसा करायचा याच्या पायऱ्या समजून घेऊया,

१. www.bankofbaroda.com या वेबसाईटवर जायचं आहे.

२. वेबसाईटवर करिअर्स या विभागात जाऊन करन्ट अपॉर्च्युनिटीवर क्लिक करायचं आहे.

३. करन्ट रिक्रुटमेंट सदरात तुम्हाला हव्या असलेल्या पद किंवा विभागावर क्लिक करायचं आहे.

४. पुढे अप्लाय नऊ या टॅबवर क्लिक करायचं आहे.

५. समोर येणाऱ्या ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती व रकाने भरून झाल्यावर तुमच्या पदासाठी असलेली ॲप्लिकेशन फी तुम्हाला भरायची आहे.

६. सबमिट केल्यावर फॉर्म भरला जाईल. पण, त्यापूर्वी तुमच्या फॉर्मची एक प्रत तुमच्याकडे रहावी यासाठी तो डाऊनलोड करून त्याची प्रिटआऊट जरुर घ्या.

(हेही वाचा – Hindu Rashtra च्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ‘सामूहिक हनुमान चालीसा पठण’ !)

वेबसाईटवर प्रत्येक पदाच्या जवळ शैक्षणिक व इतर पात्रता, कामाचं स्वरुप उपलब्ध पदं, त्यासाठी असलेलं आरक्षण अशी सर्व महिती दिलेली आहे. ती पाहून आधी सर्व माहिती करून घ्या. (Bank of Baroda SO Recruitment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.