तुम्हीसुद्धा क्यूआर कोड स्कॅन करताय? अशी घ्या खबरदारी

101

सध्या रोखीने व्यवहार करण्याऐवजी अनेकजण जी पे, फोन पे वा क्यूआर कोड यांचा वापर करतात. छोटा उद्योग करणाऱ्या लघु उद्योजकांपासून तर नोकरदारांपर्यंत सध्या सर्वच लोकांना ऑनलाइन पेमेंट करणे सहज आणि सोपे वाटत आहे. परंतु या डिजिटल पेमेंट्सचा वापर करताना अनेकदा लोकांची फसवणूक होते. त्यातून लाखो रूपयांचा गंडा घातला गेल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. म्हणूनच अनेक बॅंकांनी क्यूआर कोड स्कॅन करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

ही खबरदारी घ्या

  • आपल्या बॅंक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका.
  • सहज समजेल असा पासवर्ड ठेऊ नका.
  • सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती देऊ नका.
  • एटीएमचा पिन, यूपीआयचा पिन कोणालाही सांगू नका.
  • मोबाईलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.
  • पासवर्ड सतत बदलत रहा.
  • नेहमी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करुन ऑनलाईन व्यवहार करा.

( हेही वाचा: पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला हा निर्णय! )

गैरप्रकार झालाच तर काय कराल

  • गैरप्रकारांची तक्रार सायबर क्राईम, gov.in या संकेतस्थळावर करा
  • केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या 155260 या क्रमांकावर संपर्क साधा.
  • तक्रार दाखल होताच लगेचच कारवाईला सुरुवात होते
  • सध्या ही सुविधा छत्तीसगढ, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतच उपलब्ध आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.