मोबाईलच्या व्यसनामुळे लहान वयोगटातील मुलांना आता हमखास चष्मा लागतोय. बरं, केवळ चष्मा लागत नाही तर मोबाईल, संगणकांवर तासनतास वेळ घालवणा-या मुलांवर वेळीच नियंत्रण आणत मुलांचा ‘स्क्रिन टाइम’ सांभाळला पाहिजे. अन्यथा तुमचं मुलं चकणं होण्याची भीती वाढू शकते. नव्या जीवनशैलीत वाढत्या सोशल माध्यमांचा वापर, व्हिडिओ कॉल्स, सेल्फी आदी गोष्टींची लहान मुलांनाही सवय लागतेय. पालक लहान मुलांचा हट्ट पुरवताना सहज मोबाईलवर ऑनलाईन गेम्स खेळायला देतात. मूल जरा रडलं की त्याला शांत करण्यासाठीही मोबाईल दिला जातो, अशी कितीतरी उदाहरणं आम्ही पाहतोय, अशी माहिती नेत्र रोगतज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे बारा वयोगटापर्यंत आता चष्मा लागण्याचे तसेच डोळे कोरडं होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं निरीक्षण नेत्ररोगतज्ज्ञांनी नोंदवलं आहे.
(हेही वाचा – दररोज दात घासा अन् हृदयविकार, न्यूमोनियापासून संरक्षण मिळवा! )
मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको
डोळ्यांच्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने मुलांना डोळ्यांवर ताण येणं, मुलांच्या डोळ्यांतून पाणी येणं अशा तक्रारी पालक करतात, असे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं. मात्र लहान मुलांमध्ये चष्मा असेल तर भविष्यात डोळे तिरपेही होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. सध्या लहान मुलांमध्ये डोळे तिरपे होण्याचे प्रमाण फारसे नाही परंतु मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारींकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये, मुलांना वेळीच नेत्ररोगतज्ज्ञांकडे तपासायला न्यावं, असं आवाहनही डॉ. लहाने यांनी पालकांना केलं आहे. तुमचं मूल सहा तासांपेक्षा जास्त स्क्रिन टाईमवर असेल. तर त्याची नियमित नेत्ररोगतज्त्रांकडे तपासणी करायला हवी, असे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे.
‘स्क्रिन टाईम’ म्हणजे काय?
मूल सतत मोबाईल, संगणकावर व्यस्त असेल तर त्याला ‘स्क्रिन टाईम’ असं संबोधलं जातं. आमच्याकडे ३०० रुग्णांपैकी २५ रुग्ण लहान वयोगटातील आहेत. सर्वांची डोळ्यांच्याबाबतीतील ‘स्क्रिन टाईम’च्याच तक्रारी आहेत, असे नागपूर येथील सरकारी रुग्णालयातील नेत्ररोगविभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदन यांनी सांगितलं. लहान मुलांना चष्मा लागतोय तसंच चष्म्याचा नंबरही वेगाने वाढतोय, असेही डॉ मदन म्हणाले. लहान मुलांमधील डोळ्यांचा रॅटीना हा सात वर्षापर्यंत पूर्णपणे विकसित होत नाही. त्यामुळे सात वर्षांखालील मुलांना सतत मोबाईल वापरायला देणं हे मुलांच्या डोळ्य़ांच्या सुरक्षेसाठी घातक असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ म्हणतात.
- तुमचं मूल सतत डोळा चोळतोय, सतत डोळा मिचकावतोय, टी.व्ही.जवळून पाहतोय, पुस्तक एक फूटाहून डोळ्याजवळ घेऊन वाचतोय तर तुम्ही नेत्ररोगतज्ज्ञांकडे मुलांच्या डोळ्यांची तपासणी करा.
- बारा वयोगटापर्यंतच्या मुलांमध्ये चष्मा लागणं, डोळा कोरडा होण्याचं प्रमाण वाढतंय
डोळा कोरडा होणं म्हणजे काय?
डोळा लाल होतो, डोळ्यानजीकच्या कडा लाल होतात.
Join Our WhatsApp Community