गेल्या काही वर्षात स्मार्टफोन हॅक करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. अलिकडे सिम कार्डच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. सिम कार्डचा चुकीचा वापर करणे तुम्हाला अडचणीत आणणारे ठरू शकते. यासाठी सिम कार्डचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
( हेही वाचा : …तर तुम्ही सॅंडविच खाणे सोडून द्याल! )
अशी घ्या काळजी
- सिम कार्ड स्वॅपिंगचा वापर करून अनेक गैरव्यवहार केले जातात. सिम स्वॅपिंग म्हणजे सिम कार्ड बदलणे. फसवणूक करणारे त्याच क्रमांकाचे दुसरे सिम कार्ड जारी करतात. त्यानंतर ओटीपी मिळवून तुमच्या बॅंक खात्यातील सर्व पैसे चुकीच्या पद्धतीने काढले जाऊ शकतात.
- सोशल मीडियावर तुमचा फोन नंबर सार्वजनिक करणे टाळा.
- तुमचे सिम कार्ड एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडल्यास प्रसंगी तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. त्यामुळे तुमच्याकडे जास्त सिम कार्ड असले तरीही, तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीला सुद्धा तुमचे सिम कार्ड देऊ नका.
- सिम कार्ड हरवले तर लगेच कंपनी, पोलीस स्टेशनला संपर्क साधून मोबाईल क्रमांक बंद करा अन्यथा, कोणी तुमचे सिम कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.