Online Payment App वापरताना अशी काळजी घ्या; अन्यथा तुमचे बॅंक अकाउंट होऊ शकते रिकामे!

194

अलिकडे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने आणि सरकारने कॅशलेस सुविधांवर भर दिल्याने ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर अगदी काही मिनिटांत कोणालाही पैसे पाठवता येतात. यासाठी गुगल पे, पेटीएम आणि फोन पे सारखे डिजिटल वॉलेट उपलब्ध आहेत. ऑनलाइन पेमेंटसाठी अशा अ‍ॅप्सचा वापर केला जातो. सध्या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे एक साधी चूक सुद्धा तुमचे बॅंक खाते रिकामे करू शकते. या अ‍ॅप्सद्वारे पेमेंट करताना तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी जाणून घ्या…

( हेही वाचा : CDS पदाच्या पात्रता निकषांमध्ये बदल, संरक्षण मंत्रालयाने जारी केली नवी अधिसूचना)

पेमेंट अ‍ॅप्स लॉक ठेवा

केवळ स्मार्टफोनच नाही तर असे पेमेंट अ‍ॅप्स लॉक असणे गरजेचे असते. चुकून तुमचा फोन चोरीला गेला तर तुमचे बॅंक अकाउंट रिकामी करू शकतात.

पासवर्ड जपून ठेवा

नाव, मोबाइल नंबर, जन्मतारीख असे पासवर्ड ठेऊ नका

पिन शेअर करू नका

UPI पिन कोणासोबतही शेअर करू नये. तुमचा UPI पिन इतरांना माहित असल्यास त्वरित बदला

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा पैशांचे आमिष दाखवणारे मेसेज ई-मेल येतात. या लिंक्स ओपन किंवा यावर क्लिक करू नका. याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते.

अ‍ॅपला अपडेट करा

सर्व पेमेंट अ‍ॅप्स वेळोवेळी अपडेट करा. यामध्ये नवनवीन Security feature जोडले जातात. त्यामुळे UPI पेमेंट अ‍ॅप्सला वेळोवेळी अपडेट करा.

एकच पेमेंट अ‍ॅप वापरा

एकापेक्षा जास्त पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करणे टाळा. गरज लागल्यास केवळ व्हेरिफाइड अ‍ॅप्स Install करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.