ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिवाळीत विविध ऑफर्स देतात. परंतु ऑनलाईन शॉपिंग करताना सावधनता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत पोलिसांनीही जनजागृती सुरू केली आहे. सण-उत्सवानिमित्ताने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वस्तू आणि कपडे खरेदी केले जातात. याचा फायदा घेत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय होत असतात. म्हणूनच दिवाळीत ऑनलाईन खरेदी करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
( हेही वाचा : वंदे भारत २.० या एक्स्प्रेसचे लोकार्पण! हिमाचल प्रदेश ते दिल्ली प्रवास होणार सुसाट)
दिवाळीत ऑनलाईन खरेदी करताना घ्या विशेष काळजी
- एखादे संकेतस्थळ (online shopping website) सुरक्षित आहे की नाही ते तपासून घ्या. यासाठी संकेतस्थळामध्ये एचटीटीपीएस ही अक्षरे, कुलुपाचे चिन्ह असणे आवश्यक आहे.
- सणासुदीच्या काळात वस्तू घरी आल्यानंतरच पैसे द्या. अर्थात वस्तू खरेदी करताना Cash On Delivery हा पर्याय निवडा यामुळे तुम्ही घरी पार्सल घेतल्यानंतर खात्री करून पेमेंट करू शकता.
- कोणत्याही सार्वजनिक संगणकावरून किंवा सार्वजनिक वायफायचा access घेत वस्तू ऑर्डर करू नका.
- दिवाळीत किंवा ऑफर्स कालावधीमध्ये अमूक एका कंपनीचे तुम्ही गिफ्ट कार्ड जिंकले आहे असे अनेक मेसेज येतात अशा फसव्या मेसेजला बळी पडू नका.
- शक्यतो प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करा यामुळे तुमची आर्थिक फसवणून होणार आहे.
- बऱ्याच वेळा अनेक ऑनलाईन ऑर्डर असल्यामुळे तुम्हाला निश्चितवेळी वस्तूची डिलिव्हरी मिळणार नाही अशावेळी प्रत्यक्ष जाऊन ऑफलाईन खरेदी करणे सोयीचे ठरते.
- पोलिसांनी सुद्धा नागरिकांनी सुरक्षेची संपूर्ण खात्री करूनच ऑनलाईन खरेदी करावी व सावधानता बाळगावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.