सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. स्मार्टफोनमध्ये सुद्धा अनेक बदल झाल्याने युजर्सच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अलिकडे आपण वैयक्तिक किंवा खाजगी फोटो व्हायरल झाल्याच्या तक्रारी ऐकतो. फोनमध्ये संपूर्ण सुरक्षा असूनही फोटो-व्हिडिओ लीक होण्यामागे अनेक कारणे असतात.
( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले मोठे यश! )
त्यामुळे आपले फोटो, वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घेणे आवश्यक असते. व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मिडिया अॅप्सवरून सुद्धा खाजगी माहिती पाठवताना खबरदारी घेणे आवश्यक दरम्यान वैयक्तिक माहिती व्हायरल होण्यामागे नक्की काय कारणे आहेत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया…
थर्ड पार्टी अॅप्स वापरू नका!
मोबाईलमध्ये चुकूनही थर्ड पार्टी अॅप्स डाऊनलोड करू नका. फोटो, व्हिडिओ, वैयक्तिक माहिती लीक होण्यामागे हे थर्ड पार्टी अॅप्स कारणीभूत असतात. थर्ड पार्टी अॅप्स युजर्सकडून अनेक परवानग्या घेतात. याच्या मदतीने या अॅप्सना तुमच्या फाईल्समध्ये प्रवेश मिळतो. या फाइल्स रिमोट सर्व्हरवर अपलोड केल्या जातात. या फाईल्स स्कॅमर तृतीय पक्षांना विकतात यामुळे तुमचे फोटो आणि व्हिडिओ लीक होतात.
त्यामुळे Play Store वरून नेहमी अधिकृत अॅप्स डाऊनलोड करा. अॅप्स Install करण्यापूर्वी मोबाईलवर संबंधित अॅप धोकादायक असल्यास नोटिफिकेशन येते, अशा सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीने तुमची वैयक्तिक माहिती सुद्धा मोबाईलमधून हॅक करून चोरली जाते.
गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स या क्लाउड आधारित अॅप्सपासून संरक्षण बाळगणे गरजेचे आहे.
व्हॉट्सअॅप्सवर येणाऱ्या अज्ञात लिंकवर चुकूनही क्लिक करू नका.
हॅकर्स स्पायवेअर माध्यामातून सुद्धा लोकांना टार्गेट करतात. स्पायवेअर म्हणजेच हेरगिरी सॉफ्टवेअर तुमच्या फोनचा संपूर्ण डेटा अॅक्सेस करते. यामध्ये फोटो- व्हिडिओंचा सुद्धा समावेश आहे. वैयक्तिक माहिती हॅक करून त्यानंतर पुढे ब्लॅकमेल केले जाते. त्यामुळे मोबाईल सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community