Gmail ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी ई-मेल सेवा असून जगभरात लाखो युजर्स ई-मेल सेवा वापरतात. परंतु Gmail चे काही सोप्या नियमांचे तुम्ही पालन केले नाही तर तुमचे Gmail Account बॅन होऊ शकते. त्यामुळे Gmail Account चा वापर करताना तुम्ही या खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
( हेही वाचा : ऐन पावसाळ्यात पाणी संकट! ‘या’ भागातील पाणी पुरवठा १५ जुलैला ४ तास बंद)
अन्यथा Gmail Account होईल बॅन
- Gmail साठी ई-मेलची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या Gmail वरून एका दिवसात ५०० पेक्षा जास्त ई-मेल पाठवू शकत नाही, असे केल्यास तुमच्या Gmail अकाउंटवर १ ते २४ तासांसाठी बंदी घातली जाऊ शकते. सतत तुम्ही दिवसातून ५०० मेल पाठवत असाल तर तुमचे Gmail अकाउंट कायमचे बंद होऊ शकते.
- तुम्ही एखाद्या Inactive Email Address वर मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवल्यास तुम्हाला गुगल red flag करू शकते असे झाल्यास google अल्गोरिदम तुम्हाला स्पॅमर मानेल तसेच Gmail खाते डिसेबल किंवा तात्पुरते प्रतिबंधित केले जाऊ शकते.
- ई-मेल पाठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाऊन्स मेल प्राप्त झाल्यास तुम्हाला स्पॅमर मानले जाईल. यामुळे तुम्ही ई-मेल पाठवण्यापूर्वी मेल Address नीट तपासून घ्या. जेणेकरून ई-मेल सेंड केल्यावर परत येणार नाही.
- तुम्ही एखाद्या मेल Address वर बेकायदेशीर लिंक्स, व्हिडिओ, फोटो किंवा कोणतेही दस्तऐवज पाठवले तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. शस्त्रे विक्री व खरेदी, अमली पदार्थांची तस्करी, कॉपीराइट म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपट, बेकायदेशीर Containt ई-मेलद्वारे पाठवू नका यामुळे तुमचे अकाऊंट बॅन होण्याची शक्यता असते.