बीड्स ज्वेलरी म्हणजे काय? या छोट्या सुंदर तुकड्यांपासून नेकलेस बनवला जातो. यास मोत्यांची माळ देखील म्हणतात. याचा वापर सेमी-प्रिशियस रत्नांची माळ तयार करण्यासाठी केला जातो. भारतात विशेष प्रसंगी ही माळ घालण्याची पद्धत आहे. बीड्स म्हणजेच मण्यांच्या दागिन्यांमध्ये मुख्य सजावटीचा घटक म्हणून मणींनी सजवलेल्या विविध प्रकारच्या ॲक्सेसरीजचा समावेश होतो. हे मणी रत्न, प्लास्टिक, लाकूड, चिकणमाती, धातू, काच आणि विविध सामग्रीपासून तयार केले जाऊ शकतात. मण्यांच्या दागिन्यांचे काही सामान्य प्रकार येथे आहेत : (Beads Jewellery)
इयरिंग्स :
मण्यांपासून बनवलेले कानातले सौंदर्याला एक दैवी स्पर्श प्रदान करतात. यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. (Beads Jewellery)
अँकलेट्स (पैंजण) :
मण्यांपासून बनलेले पैंजण उबदार हवामानासाठी अतिशय योग्य आहेत. तुम्ही स्कर्ट वापरत असाल तरीही हे पैंजण खुलून दिसतील. या पैंजणांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पोशाखावर हे उठून दिसतात. (Beads Jewellery)
(हेही वाचा – Simple Latest Design of Gold Earrings : तुम्हाला शोभतील अशा सोन्याच्या इयरिंग्सच्या डिझाइन्स पहा इथे…)
हार :
वर नमूद केल्याप्रमाणे मण्यांचे हार विविध शैलीत आणि रंगात येतात. अद्वितीय आणि लक्षवेधी डिझाइन्समध्ये असलेला हा हार तुमच्या शरीराचाच एक भाग बनून जातो. (Beads Jewellery)
ब्रेसलेट :
मण्यांचे ब्रेसलेट हे कोणत्याही प्रसंगी, इतकंच काय तर रोजच्या वापरासाठी देखील योग्य आहे. मणी लवचिक दोर, तार किंवा धाग्यांवर एकत्र बांधलेले असतात. त्यामुळे हे ब्रेसलेट हलके असतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंगीत ब्रेसलेट सुद्धा घेऊ शकता. (Beads Jewellery)
हेअर ॲक्सेसरीज :
हेअरपिन, हेअरबँड्स किंवा हेअर टायमध्ये मणी विणून सुंदर असा केसांचा दागिना तयार होतो. बाहेर जाताना हेअरस्टाइल करायला वेळ नसेल तर हेअर ॲक्सेसरीज वापरुन तुम्ही तुमच्या केसांना शोभा आणू शकता. (Beads Jewellery)
तर अशा प्रकारे तुम्ही बीड्स ज्वेलरीचा वापर करु शकता. तसेच इतर दागिन्यांमध्येही याचा वापर होऊ शकतो, जेणेकरुन तुमचे दागिने इतरांपेक्षा अगदी हटके दिसतील. मग आजच मागवताय ना बीड्स ज्वेलरी? (Beads Jewellery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community