त्वचा तेलकट असण्याचे काही फायदे आहेत, तर काही तोटेही. त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर विशिष्ट तेज दिसून येते. आणि सुरकुत्याही लवकर पडत नाहीत. परंतु जास्त तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहेऱ्याला खाज येणे, त्वचा काळवंडल्यासारखी दिसणे, ब्लॅक हेडसचे प्रमाण वाढणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी करताना ती खूप रुक्षही होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. (Beauty Tips)
अशी घ्या काळजी
१) वारंवार अति तीव्र साबणाने चेहेरा धुवू नये.
२) अति प्रमाणात टोनर, ॲस्ट्रिन्जटचा वापर करू नये.
३) सौम्य फेसवॉशचा वापर करावा.
(हेही वाचा : Agri koli Bhavan : दहिसरमध्ये उभारणार आगरी कोळी भवन)
४) सौम्य फेसस्क्रबचा वापर आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावा.
५) तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ऑईल फ्री मॉईश्चरायझर तसेच कमी तेलकट सनस्क्रीन वापरावे.
६) मेकअप करतानाही जास्त तेलकट सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा.
७) आठवड्यातून एकदा गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा कमी होवून त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात.
८) गाडीवर प्रवास करताना स्कार्फचा वापर करावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community