Beauty Tips : चेहऱ्यावर काळे डाग पडल्याने त्वचा रुक्ष, कोरडी दिसते? ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा

तुरटीतील अँण्टी फंगल किंवा अँण्टी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

201
Beauty Tips : चेहऱ्यावर काळे डाग पडल्याने त्वचा रुक्ष, कोरडी दिसते? 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Beauty Tips : चेहऱ्यावर काळे डाग पडल्याने त्वचा रुक्ष, कोरडी दिसते? 'हे' घरगुती उपाय करून पाहा

अनेक वेळा स्किन इन्फेक्शन, स्किन पिग्मेंटेशनच्या समस्येमुळे त्वचा रफ होते किंवा काळपट (Dark spots) पडू लागते. यावर तुरटीचा वापर गुणकारी ठरू शकतो. तुरटीतील अँण्टी फंगल किंवा अँण्टी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. (Beauty Tips) हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्यांवर तुरटीचा उपाय करून पाहू शकता. (home remedies )

तुरटी आणि गुलाबपाणी (Alum and rose water)

तुरटी आणि गुलाब पाण्याचा वापर करून स्किन पिग्मेंटेशनचे डाग कमी होतात. याकरिता एका बाऊलमध्ये तुरटी पावडर घ्या. त्यामध्ये समप्रमाणात गुलाब जल मिसळा. ही पेस्ट त्वचेवर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ होईल.

तुरटी आणि खोबरेल तेल (Alum and coconut oil)

तुरटी आणि खोबरेल तेलाचा वापर आपण दोन प्रकारे करू शकता. स्किन जर कोरडी झाली असेल तर, एका वाटीत तुरटीची पावडर घ्या, त्यात समप्रमाणात खोबरेल तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून काही वेळाने धुवून घ्या. एका वाटीत तुरटी पावडर, खोबरेल तेल आणि एक चमचा साखर घालून साहित्य एकजीव करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. १० मिनिटानंतर कापडाने पेस्ट पुसून काढा. यामुळे चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनचे डाग निघून जातील.

तुरटी आणि ग्लिसरीन (Alum and Glycerin) 
तुरटी अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. जी त्वचेला आतून पोषण देते. ग्लिसरीन ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तुरटी आणि ग्लिसरीन एकत्र मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनचे डाग कमी होतात. यासाठी चा कोरडी राहत नाही. यासाठी एका वाटीत तुरटीची पावडर घ्या, त्यात समप्रमाणात ग्लिसरीन मिक्स करून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवा.

टिप – वरील उपाय सौंदर्यतज्ज्ञांच्या सल्ल्याने करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.