सतत वाढता ताण, मोबाईल स्क्रिन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रिन टाइम वाढल्यामुळे चेहऱ्यावरही त्याचा परिणाम जाणवू लागतो. त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा येते. चेहऱ्याची चमक कमी होते. यासाठी अनेक महागडे उपचार केले जातात, पण नेहमी फरक पडतोच असे नाही. काही वेळा सौंदर्यप्रसाधनांतील रासायनिक घटकांचाही त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याकरिता घरगुती उपचारही परिणामकारक ठरू शकतात. वाचा डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास करायचे घरगुती आणि सोपे उपचार –
बदाम तेल
बदामाचे तेल काळी वर्तुळे दूर करण्यासाठी गुणकारी ठरते. रात्रीच्या वेळी बदामाच्या तेलाचे 2-3 थेंब हातावर घेऊन डोळ्यांना हलक्या हाताने मसाज करा.
(हेही वाचा – Jammu and Kashmir : एलओसीजवळील सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार)
टोमॅटो आणि लिंबाचा रस
टोमॅटो आणि लिंबाचा रस वापरूनही काळी वर्तुळे दूर करू शकता. टोमॅटोच्या रसात 4-5 थेंब लिंबाचा रस मिसळा आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली (Eye) लावा. सुमारे 10-15 मिनिटे ठेवा. काही दिवसांनी तुम्हाला काळी वर्तुळे हलकी दिसू लागतील.
काकडी
काकडीचा वापर काळी वर्तुळे दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी काकडीचा तुकडा कापून डोळ्यांवर ठेवा. असे रोज केल्याने काळी वर्तुळे कमी होतील.
अननस आणि हळद (turmeric)
2 चमचे अननसाच्या रसात 1 चिमूट हळद मिसळा. हे मिश्रण डोळ्यांखाली लावा. सुमारे 10-15 मिनिटांनी पाण्याने धुवा.