फेस स्क्रब हा स्किन केअर रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. घरगुती पद्धतीने हे स्क्रब बनवता येतं. पण हे लावताना याची एक ठराविक वेळ असते. त्याच वेळी हे लावलं गेलं पाहिजे. हे स्क्रब संपूर्ण शरीरासाठी वापरता येतं. जाणून घेऊया , घरच्या घरी स्क्रब तयार करण्याची पद्धत –
त्वचा साफ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची सगळ्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते. फेशियल, स्क्रबिंग, टोनिंग अशी स्टेप बाय स्टेप काळजी घ्यावी लागते. स्क्रबिंग तर बाजारात भरपूर आहेत. पण कोरियन लोकांचं हे तांदळाचं गुपित, मात्र आता जगभर पसरलंय. त्यांची त्वचा बघून आता सगळ्यांना आपलीही त्वचा त्यांच्यासारखीच असावी, असं वाटत. योग्य वेळी स्क्रब केलं तर त्याचा योग्य परिणाम त्वचेवर होतो. तांदळाच्या पिठाचा वापर करून घरच्या घरी स्क्रब बनवता येतं.
त्वचा जर तेलकट असेल तर…
सकाळी उठल्यानंतर त्वचेची छिद्रे, पोअर्स उघडे असतात. स्क्रब करताना वेळेचं भान असायला हवं. सकाळी उठल्या उठल्या स्क्रब केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ५ ते १० मिनिटांच्यावर स्क्रब करू नये. त्वचेवर पिंपल्स असतील तर अजिबात स्क्रब करू नका. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्हाला स्क्रब करायची गरज नाही. अशावेळी ते टाळा. स्किन केअर रुटीन फॉलो करताना स्क्रबिंग हे केलंच पाहिजे.
तांदळाचे पीठ आणि कोरफड
एका भांड्यात 3 चमचे तांदळाचे पीठ घ्या, त्यात कोरफड मिसळा. कोरफडीची पाने नसतील तर जेल मिक्स करा. हे जेल त्वचेला लावा. संपूर्ण शरीराला मसाज केला तरीही फरक दिसेल.
तांदळाचे पीठ आणि दूध
एका भांड्यात 2 चमचे तांदळाचे पीठ आणि दूध घाला. हे स्क्रब चेहऱ्याला लावा आणि ते गोलाकार पद्धतीने मसाज करा. याने चेहऱ्यावर चांगलीच चमक येईल.
(हेही वाचा – Chandrayaan 1 ने चंद्रावर शोधले पाणी; अनेक वर्षांपासूनचा झाला खुलासा )