Beauty Tips: घरीच कोरफड जेल कसे तयार कराल, जाणून घ्या कृती

चमच्याच्या साहाय्याने पानाच्या आतील गर एका बाउलमध्ये काढून घ्या.

234
Beauty Tips: घरीच कोरफड जेल कसे तयार कराल, जाणून घ्या कृती
Beauty Tips: घरीच कोरफड जेल कसे तयार कराल, जाणून घ्या कृती

कोरफड जेल आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही गुणकारी आहे. कोरफड जेलमुळे त्वचेचं सौंदर्य वाढायला मदत होते. त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम पर्याय आहे. कोरफडीचा उल्लेख आयुर्वेदिक औषधांमध्येसुद्धा केला जातो. अनेक सौंदर्यवर्धक (Beauty Tips) उत्पादनांमध्ये कोरफडीचा वापर करतात. कोरफडीचे जेल घरच्या घरीही तयार करता येते. जाणून घ्या कृती –

कोरफडीच्या गरात जीवनसत्त्वे, खनिजे, सॅलिसिलिक अॅसिड, लिग्निन, सॅपोनिन या तत्त्वांचा समावेश असतो. बाजारात मिळणारे, रासायनिक प्रक्रिया केलेले कोरफड जेल वापरल्याने त्वचेचे नुकसान टाळता येऊ शकते.

कोरफडीच्या जेलमध्ये किंवा गरात अँण्टीएजिंग (Antiaging) आणि अँण्टीऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्म असतात. यामुळे त्वचा चिरतरुण राहायला मदत होते. कोरफड ही बहुगुणी वनस्पती आहे. घरच्या घरी कोरफडीचा गर किंवा जेल तयार केल्यास त्याच्या शुद्धतेची १०० टक्के खात्री देता येते.

घरगुती कोरफड जेल कसे तयार कराल –
कोरफडीच्या रोपट्याचे एक मोठे पान काढून घ्या. त्यानंतर हे पान स्वच्छ धुवून त्याच्या मुळाचे टोक पाण्यात भिजेल एवढे एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात हे पान थोडा वेळ बुडवून ठेवा. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने पानावरचे टोकेरी काटे काढून टाका. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने पानाच्या आतील गर एका बाउलमध्ये काढून घ्या. एका मिक्सरमध्ये हा गर घालून फिरवून घ्या. आता त्यामध्ये बदामाचे ४ ते ५ थेंब बदामाचे तेल घाला. हे जेल केसांसाठी वापरणार असाल, तर यामध्ये टी-ट्री ऑईलचे काही थेंब घालावेत यामुळे केसांतील कोंडा दूर व्हायला मदत होते. याशिवाय केसांसाठी रोजमेरी किंवा पेपरमिंट ऑईलचे काही थेंबही घालू शकता. यामुळे केसांची वाढ व्हायला मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.