झेंडुच्या फुलांमध्ये औषधी गुणधर्म (Beauty Tips) असतात. त्वचेसाठी या फुलांचा उपयोग फायदेशीर ठरतो. बाजारातून आणलेली फुले सुकल्यास त्यापासून घरच्या घरी सौंदर्योपचार म्हणून वापर होऊ शकतो. या फुलांमुळे त्वचेचे सौंदर्य वाढतेच शिवाय झाडांनाही नैसर्गिक खत मिळेल, जाणून घ्या –
त्वचेसाठी स्क्रब
हात किंवा पाय, मान, पाठ यावर टॅनिंग झालं असेल, किंवा हे अवयव काळवंडले असतील तर ती त्वचा स्वच्छ करण्यासाठी झेंडुच्या फुलांचं स्क्रब घरच्या घरी तयार करता येतं. यासाठी झेंडुच्या फुलांच्या पाकळ्या काढून घ्या त्या मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडीभरडी पेस्ट करावी. त्यामध्ये थोडी साखर आणि मध घालून हे मिश्रण हात, पाय, पाठ, मान आणि त्वचेवर हलक्या हाताने चोळून लावा. नंतर स्वच्छ धुवून घ्या, मात्र या मिश्रणाचा चेहऱ्यासाठी उपयोग करू नका.
झाडांसाठी खत
ज्या झाडांना फुले येत नाहीत, अशा झाडांना झेंडुचं खत घातलं, तर फायदा होतो. झाडांसाठी झेंडुचा वापर करण्यासाठी झेंडुची फुले मिक्सरमधून वाटून घ्या. हे खत तयार करण्यासाठी ३०० ग्रॅम फुलांमद्ये दहा ग्रॅम गूळ घाला. त्यामध्ये १ हजार मिली. पाणी घाला. हे सगळं मिश्रण एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून ठेवा. अडीच ते तीन महिने ही बाटली सूर्यप्रकाशात येणार नाही, अशा जागी ठेवा. यामुळे बाटलीत बायो एन्झाईम तयार होईल. ते झाडांवर शिंपडा. यामुळे झाडाला फुले यायला मदत होईल.