ऑक्टोबरमध्ये उष्णतावाढीचे त्रास काही जणांना भेडसावू शकतात, तर काही जणांना प्रत्येकच ऋतुत काखेत घाम येण्याचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी अनेक जण डिओडोरंट, परफ्युम किंवा रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. या उत्पादनांचा प्रभाव अतिशय कमी वेळ टिकतो. काखेतील घामाच्या दुर्गंधीचा हा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपायांचीही मदत फायदेशीर ठरू शकते. याचे दुष्परिणाम त्वचेवर होत नाहीत शिवाय हे घरगुती उपाय सर्वांनाच परवडणारे, अल्प किमतीत होणारे असतात. यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते.
टी ट्री ऑईल
घामाचा वास दूर करण्यासाठी एका बाउलमध्ये टी ट्री ऑईल दोन चमचे आणि पाणी दोन चमचे घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर ते तुमच्या अंडरआर्म्सवर स्प्रे करा. यानंतर १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. काही वेळाने कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ते स्वच्छ करा. अंघोळ करण्यापूर्वी ही पद्धत वापरून पाहा. या उपायामुळे घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळेल.
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर हा घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कापसाचा बोळा बुडवा आणि काखेत लावा. हा उपाय दिवसातून दोनदा वापरू शकता. यामुळे बॅक्टेरिया नष्ट व्हायला मदत होते.
(हेही वाचा Crime: येरवड्यातून ससूनमध्ये आणि ससूनमधून थेट पसार; ड्रग माफियाची फिल्मी कहाणी…)
बेकिंग सोडा
काखेतील घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस समान प्रमाणात घाला आणि व्यवस्थित मिसळा. अंघोळ करण्यापूर्वी हे मिश्रण काखेत लावा. दोन ते तीन मिनिटे राहू द्या. यानंतर ते स्वच्छ पुसून किंवा धुवून घ्या.
टोमॅटोचा रस
टोमॅटोची पेस्ट करा. यामध्ये लिंबाचा रस घाला. व्यवस्थित मिसळा. आता हे मिश्रण काखेला लावून मसाज करा. त्यानंतर स्वच्छ धुवा.
लिंबू
एका भांड्यात अर्ध्या लिंबाचा रस घ्या. त्यात थोडे पाणी घाला. हे मिश्रण रोज अंडरआर्म्सवर लावा. त्यानंतर सुकल्यावर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. काखेतील घामाच्या दुर्गंधीपासून सुटका होण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
Join Our WhatsApp Community