Beauty Tips : केस विरळ झाले आहेत, ‘हा’ करा घरगुती सोपा उपाय

घरच्या घरी अळशीच्या बियांचे हेअर जेल बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे.

226
Beauty Tips : केस विरळ झाले आहेत, 'हा' करा घरगुती सोपा उपाय
Beauty Tips : केस विरळ झाले आहेत, 'हा' करा घरगुती सोपा उपाय

सध्याची अतिव्यस्त (Beauty Tips) जीवनशैली, कामाचा वाढता ताण, खाण्याच्या अनियमित वेळा यामुळे केसांवर परिणाम होतो. काही वेळा केस गळू लागले की, बाजारातली महागडी उत्पादनेही वापरली जातात. यामुळे काही वेळा केस गळण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा वाढू शकते. केसांवर घरगुती सोपे उपायही परिणामकारक ठरू शकतात. केसवाढीसाठी अळशीच्या बियांचा घरगुती उपाय (home remedy) केल्यास फायदेशीर ठरू शकतो.

अळशीमध्ये ओमेगा -३ फॅटी अॅसिड, प्रथिने, अँण्टीऑक्सिडंट्स असतात. आळशीच्या बियांचे घरच्या घरी हेअर जेलही तयार करता येते.

अळशीच्या बिया पाण्यात भिजवल्यानंतर किंवा पाण्यात उकळवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या चिकट द्रावात पोषक गुणधर्म असतात. हे जेल तयार करण्यासाठी एका भांड्यात घाला. त्यात अळशीच्या बिया घालून ते पाणी उकळवा. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यावर कॉटनच्या कापडाने पाणी गाळून घ्या. अळशीच्या बियांचे हे जेल एका काचेच्या बरणीत भरून ठेवा.

(हेही वाचा –PM Narendra Modi : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? पंतप्रधान मोदींची टीका )

हे जेल केसांना लावून व्यवस्थित मसाज करा. केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसांना हे जेल लावा. यात जीवनसत्त्व ई असते. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. या मास्कमध्ये कोरफडीचा गरही मिसळू शकता. हे जेल १० ते १५ मिनिटे व्यवस्थित केसांना लावल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. या उपायामुळे केस मऊ, मुलायम होण्यास मदत होईल.

आळशीच्या बियांमध्ये दही मिसळून केसांना लावा. यामुळे केस वाढायला मदत होते याशिवाय केसातील कोंडा कमी होतो. आळशीच्या बियांच्या पावडरमध्ये दही मिसळून केसांना लावा. त्यानंतर २० मिनिटांनी माईल्ड शॅम्पूने केस धुतल्यास फायदा होतो.

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.