रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला पुन्हा थर्ड एसी कोचमध्ये बेडरोल सुविधा मिळणार आहे. कोरोना महामारीमुळे रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमध्ये बेडरोलची सुविधा बंद केली होती. परंतु आता रेल्वेने पुन्हा प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याची घोषणा केली आहे. ज्या डब्यांमध्ये आतापर्यंत बेडरोल उपलब्ध नव्हते, त्या डब्यांमध्येही आता प्रवाशांना बेडरोलची सुविधा मिळणार असल्याचे रेल्वेने सांगितले.
( हेही वाचा : IRCTC Booking : आता चॅटबॉटद्वारे करता येणार रेल्वे तिकिटांचे बुकिंग)
थर्ड एसी इकॉनॉमीमध्ये बेडरोलही उपलब्ध असेल
भारतीय रेल्वेने अनेक गाड्यांमध्ये एसी डब्यांसह थर्ड एसी इकॉनॉमी क्लासचे डबेही ठेवले आहेत. या वर्गाची तिकिटे सामान्य थर्ड एसी क्लासपेक्षा कमी आहेत, मात्र यामध्ये रेल्वेकडून आतापर्यंत बेडरोल उपलब्ध नव्हते. आता या डब्यातील प्रवाशांना बेडरोलची सुविधाही देण्यात येणार असल्याचे भारतीय रेल्वे विभागाने सांगितले. रेल्वे मंत्रालयाच्या घोषणेनुसार, 20 सप्टेंबर 2022 पासून, थर्ड एसी इकॉनॉमी क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेडरोल देखील देण्यात येईल.
खालील नमूद केलेल्या गाड्यांमध्ये बेडरोल या तारखेपासून सुविधा सुरू होणार
दिनांक 8 जानेवारी 2023 पासून
- 12115/12116 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस.
- 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस.
- 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी कामायनी एक्सप्रेस.
- 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज जंक्शन तुळशी एक्सप्रेस.
- 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर गोदान एक्सप्रेस.
दिनांक ९ जानेवारी 2023 पासून
- 11059 लोकमान्य टिळक टर्मिनस – छपरा एक्सप्रेस.
- 22103 लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या एक्सप्रेस.
- 12105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस.
- 12534 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस.
- 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया एक्सप्रेस.
- 12869 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा एक्सप्रेस.
- 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा मेल नागपूर मार्गे.
- 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा गीतांजली एक्सप्रेस.
- 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस.
- 16381 पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस.
दिनांक 11 जानेवारी 2023 पासून
- 22101 लोकमान्य टिळक टर्मिनस – मदुराई एक्सप्रेस.
- 11081 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस.
- 22183 लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या साकेत एक्सप्रेस
दिनांक 12 जानेवारी 2023 पासून
- 11079 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस.
दिनांक 14 जानेवारी 2023 पासून
- 11017 लोकमान्य टिळक टर्मिनस – कारैक्काल एक्सप्रेस.
दिनांक 15 जानेवारी 2023 पासून
- 12143 लोकमान्य टिळक टर्मिनस – सुलतानपूर सुपरफास्ट एक्सप्रेस.
- 16331 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम एक्सप्रेस.