गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान झपाट्याने वाढले आहे. कधी अचानक तापमान वाढते तर कधी अचानक कमी होते. त्यात मोका वादळामुळे मागील दोन – तीन दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमान वाढले आहे. लहान बालक असो किंवा वृद्ध व्यक्ती असो.. उन्हातून आल्यावर थंड पाण्याचा ग्लास ओठाला लावण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता येत नाही. बाहेरून आल्या आल्या थंड पाण्याचा ग्लास ओठाला लावल्यावर तात्पुरता छान वाटते. मात्र आरोग्यावर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होतात. ज्यात घसा खवखवणे, पचन संस्थेवर नकारात्मक परिणाम होणे यांचा समावेश होतो. पण थंड पाण्याच्या सतत सेवनामुळे एक धोकादायक रोग होण्याची शक्यता वाढली आहे.
घशाला पडेल कोरड
प्रमाणात केलेली कोणतीही गोष्ट आरोग्यासाठी हानीकारक ठरत नाही. मात्र मर्यादेपलीकडे गेलेली कोणतीही गोष्ट केल्यावर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्यामुळे शरीरातील रक्त वाहिन्या हळूहळू खराब होतात. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ‘वासोस्पॅझम’ नावाची एक स्थिती उद्भवण्याची भीती असते. या स्थितीत क्तवाहिन्या बंद होऊन रक्तप्रवाह थांबला जातो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, चक्कर येणे, छातीत दुखणे असे त्रास होऊ शकतात.
(हेही वाचा The Kerala Story : चित्रपट देशभर सुरु मग प. बंगालमध्येच का बंदी? सर्वोच्च न्यायालयाने सुनावले)
हृदयविकार आहे?
खरंतर हृदयविकार असणाऱ्यांनी थंड पाणी पिणे टाळावे. कारण सामान्य व्यक्तीपेक्षा त्यांना वासोस्पॅझम होण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
पण थंड पाणी प्यायचे असेल तर?
उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी न पिणे कोणालाही अवघड जाऊ शकते. यावर एक पारंपारिक उपाय आहे. बाजारात काळ्या, लाल रंगाचे माठ उपलब्ध आहेत. त्यात पाणी साठवले तर गार पाण्याचा आनंद मिळतो आणि आरोग्याला हानी पोहोचत नाही.
Join Our WhatsApp Community