Chaudhary Charan Singh Airport वर जाण्याआधी तिथल्या सुविधांबद्दल जाणून घ्या

153
Chaudhary Charan Singh Airport वर जाण्याआधी तिथल्या सुविधांबद्दल जाणून घ्या

चौधरी चरणसिंह इंटरनॅशनल विमानतळ हे उत्तर भारतातलं लखनऊ येथे असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ शहरापासून चौदा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. विमानतळ असलेल्या विभागाचं नाव अमौसी असं आहे. (Chaudhary Charan Singh Airport)

विमानतळाच्या नावाचा इतिहास

पूर्वी या विमानतळाला अमौसी विमानतळ नावाने ओळखलं जायचं. नंतर भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या नावावरून या विमानतळाचं नाव चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ असं ठेवण्यात आलं. हे विमानतळ लखनऊ इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्या मालकीचे आहे. सध्या हे विमानतळ पब्लिक-प्रायव्हेट कंसोर्टीयम मध्ये अदानी ग्रुप्सतर्फे संचालित आहे. (Chaudhary Charan Singh Airport)

विमानतळाचा दर्जा

भारतातल्या प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने पाहिलं तर, जगातल्या सर्वात व्यग्र राहणाऱ्या विमानतळांच्या यादीमध्ये चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाचा क्रमांक ११ व्या स्थानावर येतो. या विमानतळावर एकूण तीन ऑपरेशनल टर्मिनल्स आहेत. त्यांपैकी तिसऱ्या टर्मिनलचं उद्घाटन १० मार्च २०२४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. (Chaudhary Charan Singh Airport)

(हेही वाचा – हिंदूंना हिंसाचारी म्हणणारे Rahul Gandhi यांना घ्यायचे पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन)

लॅंडिंगची व्यवस्था

या विमानतळावर ९,००३ फूट लांबी आणि २०० फूट रुंदीची खराब हवामानातही व्यवस्थित लँडिंग करता येण्यासाठी सक्षम असलेली धावपट्टी आहे. याव्यतिरिक्त या वर्षाच्या शेवटपर्यंत या विमानतळाच्या धावपट्टीवर एअरबस ३५० आणि बोइंग ७८७ यांसारख्या मोठ्या फ्लाईट्स चालवण्यात याव्या म्हणून धावपट्टीची सुधारणा आणि तिच्या क्षेत्राचा विस्तार करण्यात येत आहे. (Chaudhary Charan Singh Airport)

प्रवाशांसाठी सुविधा

याव्यतिरिक्त विमानतळावर प्रवाशांच्या सुविधेसाठी विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधांचे पॅकेजेस देण्यात येतात. हे सगळं काम प्रणाम मीट अँड ग्रीट या संस्थेमार्फत सर्व्हिस देण्यात येते. जसे की, कॉर्पोरेट प्रवाशांना व्यावसायिक सहाय्य, तसंच ग्रुपने प्रवास करणारे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि सोलो प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही अनेक सुविधांचे पॅकेजेस त्यांच्या गरजेनुसार उपलब्ध करून दिले जातात. (Chaudhary Charan Singh Airport)

इतर सुविधा

विमानतळावरच्या इतर सुविधांमध्ये इन-लाईन बॅगेज हँडलिंग सिस्टीम, कन्व्हेअर बेल्ट, बुकिंग काऊंटर, इमिग्रेशन आणि इमिग्रेशन काऊंटर, चेक-इन, किऑस्क, सीसीटीव्ही, वॉशरूम्स, एटीएम, रेस्टॉरंट, लाऊंज, अनेक रिटेल स्टोअर्स, लॉस्ट अँड फाऊंड रजिस्टर, चाईल्ड केअर, वैद्यकीय आणि आपत्कालीन सुविधा, कार्गो सर्व्हिस, दिव्यांगांसाठी सुविधा, ड्युटी फ्री, फॉरीन मनी ट्रान्स्फर आणि इन्फॉर्मेशन डेस्क अशा कित्येक प्रकारच्या सुविधा या विमानतळावर उपलब्ध आहेत. (Chaudhary Charan Singh Airport)

विमानतळावरून शहरात जाण्यासाठी प्रवास

या विमानतळाच्या सर्वात जवळचं रेल्वे स्थानक अमौसी हे आहे. हे रेल्वे स्थानक लखनऊच्या उपनगरीय स्थानकांपैकी एक आहे. अमौसी रेल्वे स्थानकापासून विमानतळ हे फक्त सात किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. विमानतळाच्या टर्मिनल २ च्या समोर फक्त एक किलोमीटर एवढ्या अंतरावर अमौसी मेट्रो स्टेशन आहे. (Chaudhary Charan Singh Airport)

याव्यतिरिक्त चारबाग रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी इथे एसी आणि नॉन-एसी बसेसची सुविधा आहे. तसेच विमानतळाच्या गेटवरून प्रवाशांच्या सुविधेसाठी टॅक्सी स्टँड उपलब्ध केलेलं आहे. इथून प्रवासी ओला कॅब्स, ऊबर, इन ड्राईव्ह, रॅपिडो यांसारख्या प्रायव्हेट कार्स बुक करू शकतात किंवा इथल्या लोकल रिक्षा आणि टॅक्सीही स्टँडवर उभ्या असतात, त्यांच्यातूनही प्रवासी त्यांना हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतात. (Chaudhary Charan Singh Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.