Belapur Fort : चिमाजी अप्पांनी जिंकलेल्या बेलापूरच्या किल्ल्याचं काय आहे वैशिष्ट्य?

30
Belapur Fort : चिमाजी अप्पांनी जिंकलेल्या बेलापूरच्या किल्ल्याचं काय आहे वैशिष्ट्य?

बेलापूरचा किल्ला हा महाराष्ट्रातल्या नवी मुंबईच्या भागामध्ये बेलापूर शहराजवळ असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला जंजीराच्या सिद्दीने बांधला होता. त्यानंतर तो पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात घेतला. पोर्तुगीजांकडून हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. पण पुढे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला या किल्ल्यावर ब्रिटिशांनी ताबा मिळवला. त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेन्सीचा विस्तार झाल्यामुळे या विभागात ब्रिटिशांचं वर्चस्व वाढलं आणि बेलापूरच्या किल्ल्याचं महत्त्व कमी झालं. त्यानंतर तो फारसा वापरात आला नाही. (Belapur Fort)

(हेही वाचा – kalamb beach : सर्वांगसुंदर अशा कळंब बीच जवळ कोणतं रेल्वे स्थानक आहे?)

बेलापूरच्या किल्ल्याचा इतिहास

१५६० ते १५७० सालादरम्यान सिद्दीने बांधलेला हा किल्ला पुढे पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. हा किल्ला पनवेल खाडीच्या तोंडाजवळ एका डोंगराच्या माथ्यावर आहे. १६८२ साली बेलापूरजवळ असलेला सिद्दीच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर पोर्तुगीजांनी ताबा मिळवला होता.

१७३३ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी जवळ असलेल्या अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरात बेलाच्या पानांचा हार अर्पण केला आणि किल्ल्याला बेलापूरचा किल्ला असं नाव दिलं. २३ जून १८१७ सालापर्यंत मराठ्यांनी या भागात राज्य केलं. त्यानंतर हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन चार्ल्स ग्रे यांनी ताब्यात घेतला आणि ब्रिटिशांनी या किल्ल्याची नासधूस केली.

बेलापूरच्या या किल्ल्यावर इंग्रजांच्या चार कंपन्या होत्या. या कंपन्यांमध्ये प्रत्येकी १८० सैनिक होते. तसंच ४ ते १२ पौंड म्हणजेच २ ते ५ किलोग्राम वजनाच्या १४ तोफा होत्या. या किल्ल्यात एक भुयार देखील अस्तित्वात आहे असं मानलं जातं. अनेक स्थानिकांचा असा विश्वास आहे की, हे भुयार घारापुरी बेटावर एलिफंटा लेण्यांना जोडतं. (Belapur Fort)

(हेही वाचा – 5 star hotels in goa : गोव्यामध्ये गेलात तर ‘ह्या’ 5 star हॉटेलमध्ये रहा आणि पिकनिकचा आनंद घ्या)

बेलापूरच्या किल्ल्याचे जीर्णोद्धार

बेलापूरचा हा किल्ला शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोच्या अखत्यारीत येतो. सध्या तो जीर्ण अवस्थेत आहे. वारंवार झालेल्या आक्रमणांमुळे हा किल्ला नष्ट होण्याचा धोका आहे. म्हणून या किल्ल्याचं नूतनीकरण करण्याची योजना सुरू आहे. या किल्ल्याला कचरा आणि कचरा टाकण्यार्‍यांपासून वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर केला आहे. या परिसरात असलेला पाणीपुरवठा करणारा एक तलाव देखील बुजण्याचा धोका आहे. जानेवारी २०१८ सालापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार किल्ल्याचं कोणतंही नूतनीकरण किंवा जीर्णोद्धार झालेला नाही. (Belapur Fort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.