जगभरातील करोडो लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळी चहा (Black Tea) प्यायल्यानंतर लोकांना ताजेतवाने वाटते. चहा हे सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे, लोकांना त्याचे वेड आहे. चहा पिऊन लोकांना ऊर्जा मिळते. साधारणपणे लोकांना दुधासोबत चहा प्यायला आवडतो, पण ते आरोग्यासाठी फारसे फायदेशीर नसते. जेव्हा चहा साखर आणि दुधाशिवाय बनवला जातो तेव्हा त्याला ब्लॅक टी किंवा डार्क टी म्हणतात. ब्लॅक टी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, संशोधकांनी एका नव्या संशोधनात ब्लॅक टी बाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नवीन संशोधनानुसार, दररोज ब्लॅक टी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारून टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. ब्लॅक टी चे नियमित सेवन केल्याने मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड विद्यापीठ आणि चीनच्या साउथईस्ट विद्यापीठाच्या संशोधकांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. या संशोधनात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, जे दररोज ब्लॅक टी (Black Tea) पितात त्यांच्यामध्ये प्री-डायबिटीजचा धोका ५३ टक्क्यांनी कमी होतो आणि टाइप २ मधुमेहाचा धोका ४७ टक्क्यांनी कमी होतो. म्हणजेच जर तुम्ही दररोज १ कप ब्लॅक टी प्यायला तर तुम्ही मधुमेहापासून वाचू शकता.
ब्लॅक टी चे मोठे फायदे
- ब्लॅक टी (Black Tea) प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
- रोज ब्लॅक टी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
- ब्लॅक टी पचनासाठी फायदेशीर ठरू शकतो.
- ब्लॅक टी शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास उपयुक्त आहे.
- ब्लॅक टी त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.