आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तणाव असते. (Meditation) अगदी लहान मुलांपासून ते प्रौढ लोकांपर्यंत सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तणाव असतोच. दिवसभरात आपण जे काम करतो, त्यात आपण आपली १०० टक्के ऊर्जा लावतो. त्यामुळे मनाला आराम मिळाला नाही, तर चिडचिड होते आणि तणाव वाढू शकतो. तणाव जास्त वाढल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी, मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे तणावमुक्त होण्यासाठी मेडिटेशन हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. (Meditation)
मेडिटेशन केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत होते. मेडिटेशन करण्यासाठी कुठल्याही तिसऱ्या गोष्टीची गरज लागत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मेडिटेशन करू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला, मेडिटेशन कसे करायचे आणि त्याचे काय फायदे आहेत, हे सांगणार आहोत.
(हेही वाचा – Mumbai University : मुंबईत रंगणार शिवकालीन क्रीडा महोत्सव; मुंबई विद्यापीठ देणार प्रोत्साहन)
१. मेडिटेशन कसे करायचे ?
सर्वांत आधी एक चांगली जागा निवडा आणि चटई किंवा चादर टाकून त्यावर मंडी घालून बसा. डोळे बंद करा आणि मेडिटेशनला सुरवात करा. (Meditation)
२. दीर्घ श्वास घ्या
मेडिटेशनला सुरवात करत असतांना सगळ्यात आधी ध्यान लावताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा. तुमचा मेंदू आणि शरीर शांत होऊ द्या.
३. शांत परिसर निवडा
मेडिटेशन करत असताना, तुमच्या आजूबाजूचा परिसर शांत असेल, याची खात्री करा. त्यामुळे तुमचे मन आणि मेंदू विचलित होत नाही. ध्यान लागून रहाण्यात मदत होते.
४. आरामदायी स्थिती निवडा
तुम्ही शांतपणे मेडिटेशन करत आहात, याबाबत खात्री करून घ्या. मेडिटेशन करत असतांना आपण नीट बसलो आहोत कि नाही, याची खात्री केल्यावरच मेडिटेशनला सुरवात करा. त्यासाठी मेडिटेशन करतांना आरामदायी कपडे वापरा.
५. शरीरावर लक्ष केंद्रित करा
आपण मेडिटेशन करताना, आपले मेंदू आणि मन शांत होते. त्यामुळे शरीरात असलेला त्रास कळून येतो. शरीरात असलेल्या त्रासाचे समाधान शोधण्यासाठी मेडिटेशनसह योगासने करा. (Meditation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community