आरोग्य चांगले राहण्यासाठी कित्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. (Benefits of silent walking) सकाळी चालण्याचा व्यायाम हा अनेकांच्या आवडीचा आहे. अशा वेळी चालताना मन शांत करण्यासाठी काही जण गाणी ऐकतात, तर काही जण सहकाऱ्यांशी गप्पा मारत चालण्याचा आनंद घेतात. अलीकडे शांतपणे चालणे म्हणजे सायलेंट वॉक हा व्यायाम प्रकार प्रसिद्ध होत आहे. काय आहे सायलेंट वॉक ? जाणून घेऊया !
सायलेंट वॉकिंग म्हणजे नेमके काय ?
कोणाशीही गप्पा न मारता, कोणत्याही गॅजेट्सचा वापर न करता, मौन धारण करून चालणे म्हणजे सायलेंट वॉकिंग. यावेळेस तुमचे लक्ष केवळ निसर्गावर केंद्रित असणे आवश्यक आहे. ज्यामुळे शारीरिक मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळू शकते. जे लोक एकाग्रतेनं सायलेंट वॉक करतात, त्यांना आपण सभोवतालच्या जगाशी जोडले गेलो आहोत, अशी जाणीव होते. तसंच त्यांच्यातील एकग्रता क्षमता देखील वाढते. (Benefits of silent walking)
कोणतेही गाणे न ऐकता शांतपणे वॉक केल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते. हा प्रकार तुम्हाला कंटाळवाणा वाटत असल्यास रोज नवनवीन ठिकाणी वॉक करावे.
सायलेंट वॉकचे फायदे
- आपला मेंदू दिवसभर कोणत्या-न्-कोणत्या कामात व्यस्तच असतो. परिणामी आपला मेंदू थकतो. दिवसभरातील थकवा, ताणतणाव, चिंता यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मेंदूला शांतता मिळणे आवश्यक आहे. म्हणून सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस सायलेटं वॉक केल्यास तुमचया मनाला शांतता मिळू शकते.
- जी मंडळी नेहमीच कोणत्या-न्-कोणत्या कामामध्ये व्यस्त असतात. अशा लोकांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. परिणाम या लोकांमध्ये नैराश्य, ताण, चिंता यासारख्या समस्या निर्माण होतात. पण या समस्यांपासून मुक्तता मिळवायची असेल तर सायलेंट वॉकची आपण मदत घेऊ शकता. यामुळे सकारात्मकता देखील वाढण्यास मदत मिळू शकते.
- वॉक केल्यानं शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळे तुमच्या शरीरातील आळस देखील दूर होण्यास मदत मिळते. कारण सायलेंट वॉक केल्याने शारीरिक थकवा दूर होतो. (Benefits of silent walking)