पावसाळ्यात गरमागरम चहासोबत वडापावचा आस्वाद घेणं म्हणजे स्वर्गसुख! वडापाव म्हणजे मुंबईकरांसाठी एक विशेष पर्वणीच असते. मुंबईतील प्रत्येक माणसाच्या तोंडी ऐकलेलं वाक्य म्हणजे मी वडापाव खाऊन दिवस काढलेत….आपण पाहूयात मुंबईतील फेमस वडापाव स्पॉट येथीस गरमागरम वडापावचा आस्वाद तुम्ही एकदा तरी घ्यायलाच हवा…
अशोक वडापाव
ठिकाण – किर्ती कॉलेज
दादरमधील किर्ती कॉलेज जवळ अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील या वडापावचा आस्वाद घेतला आहे. अशोक वडापाव येथे मिळणारा चुरा पाव देखील खाद्यप्रेमींची फेव्हरेट आहे.
सम्राट वडापाव (पार्लेश्वर)
ठिकाण – विलेपार्ले पूर्व
किंमत – २० रुपयांपासून सुरू
विलेपार्ले स्थानकांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सम्राट वडापावमध्ये तुम्ही पारंपरिक वडापाव व्यतिरिक्त विविध प्रकारचे वडापाव उदाहरणार्थ चीझ वडापाव, शेजवान वडापाव, मसाला पाव असे पदार्थ ट्राय करू शकता.
भाऊ वडापाव
ठिकाण -भांडुप पश्चिम
किंमत – २० रुपये
भांडुपमधील सर्वात फेमस वडापाव सेंटर म्हणजे भाऊ वडापाव. सर्वसामान्य वडापावपेक्षा हा आकाराने किंचित मोठा असल्याने एक वडापाव खाल्ला तरी तुमचे पोट भरू शकते तसेच या वडापावसोबत चुरा सुद्धा दिला जातो.
आराम वडापाव
ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
किंमत – २० रुपये
ऑगस्ट १९३९ मध्ये तांबे कुटुंबीयांनी आराम वडापाव सुरू केला. आराम वडापाव सेंटरमध्ये सुरूवातीच्या काळात फक्त ५ रुपयात वडापाव मिळत होता आता या वडापावची किंमत २० रुपये आहे. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनससमोरच सिग्नल ओलांडला की, तुम्हाला आराम वडापाव सेंटर दिसेल.
गजानन वडापाव
ठिकाण – ठाणे पश्चिम
किंमत – १५ रुपये
चटणीसाठी लोकप्रिय असणारा वडापाव म्हणजेच ठाण्यातील गजानन वडापाव. हे सेंटर ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी असते. तसेच या वडापावसोबत हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा सर्व्ह केला जातो.
मसाला वडापाव
ठिकाण – मुलुंड
किंमत – २५ रुपये
मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाजवळ एका छोट्या स्टॉलवर मसाला वडापाव ही हटके रेसिपी गेली कित्येक वर्ष विकली जात आहे.
ग्रॅच्युएट वडापाव
ठिकाण – भायखळा
भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅच्युएट वडापाव मिळतो. हा मुंबईतीस प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेले १७ वर्ष लोक येथील वडापावचा आस्वाद घेतला जात आहे.
आनंद वडापाव
ठिकाण- मिठीबाई कॉलेज समोर
किंमत – २५ रुपयांपासून सुरू
मुंबईतील बेस्ट वडापावचा किताब सर्वाधिक वेळा मिळवलेले ठिकाण म्हणजे मिठीबाई कॉलेजसमोर असलेला आनंद स्टॉल येतील वडापाव. पावाला बटर आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चटणी लावून हा वडापाव सर्व्ह केला जातो. याशिवाय येथे मेयॉनिज, चीझ वडापाव, ग्रील वडापाव देखील तुम्ही ट्राय करू शकता.
बोरकर वडापाव
ठिकाण- गिरगाव
गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईतील प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना प्रचंड आवडते. तुम्ही गिरगाव चौपाटीवर देखील या वडापावचा आस्वाद घेऊ शकता.
कुंजविहार वडापाव
ठिकाण – ठाणे पश्चिम
ठाणे (पश्चिम) रेल्वे स्थानकापासून अगही हाकेच्या अंतरावर मिळणारा हा कुंजविहार वडापाव खाद्यप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.
Join Our WhatsApp Community