पावसाळा आला की, प्रत्येकाला निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचे वेध लागतात अनेकदा कामामुळे किंवा सुट्टीची अडचण येऊन आपल्याला फिरण्याचे प्लॅन रद्द करावे लागतात. परंतु आम्ही तुम्हाला मुंबई जवळच्या काही पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत. येथे जाण्यासाठी तुम्हाला अगदी १ दिवस सुद्धा पुरेसा आहे. जाणून घेऊया, पावसाळी सुट्टी Enjoy करण्यासाठी मुंबईजवळील टॉप १० जागा….
( हेही वाचा : Monsoon Food : पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्यासाठी ‘या’ आहेत मुंबईतील TOP 10 जागा!)
संजय गांधी नॅशनल पार्क
ठिकाण – बोरीवली
वेळ – सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३०
मुंबईत बोरीवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अनेक लोक फिरायला जातात. याठिकाणी तुम्ही कन्हेरी लेण्या, सिंहविहार, वनराणी अशा विविध ठिकाणी फिरू शकता शिवाय या नेचर स्पॉटवर तुम्हाला सुंदर फोटो, तुमचे रिल्स व्हिडिओ शूट करता येतील. बोरीवली स्थानकावरून तुम्ही रिक्षा किंवा खाजगी वाहनाने नॅशनल पार्कला जाऊ शकता. येथे फिरण्यासाठी तुम्हाला भाडेतत्वावर सायकल सुद्धा मिळते.
कोंडेश्वर धबधबा
ठिकाण – बदलापूर
बदलापूरमधील कोंडेश्वर धबधबा व मंदिर पिकनिकसाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात एक दिवस पिकनिकसाठी तुम्ही या ठिकाणी नक्की जाऊ शकता. या परिसरात शंकराचे मंदिर आहे. बदलापूर रेल्वेस्थानकावरून तुम्ही कोंडेश्वरला जाऊ शकता.
तुंगारेश्वर
ठिकाण – वसई
वसई जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तुंगारेश्वर धबधब्यावर पिकनिकसाठी अनेक पर्यटक जातात. तुंगारेश्वर धबधब्यावर जाण्यासाठी तुम्हाला २ तासांचा ट्रेक करत जावे लागेल. वसई रेल्वेस्थानकावरून रिक्षा अथवा बसने तुम्ही तुंगारेश्वरला जाऊ शकता.
कमला नेहरू पार्क
ठिकाण – उत्तर मुंबई
वेळ – सकाळी ५ ते रात्री ९
मुंबईतील प्रसिद्ध मलबार हिलच्या समोर असलेलं कमला नेहरू पार्क मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. लहान मुलं सुद्धा याठिकाणी मनसोक्स Enjoy करू शकतात. कमला नेहरू पार्क मुंबईतील बाबुलनाथ अथवा मलबार हिलवरून जवळ आहे.
गोराई बीच
ठिकाण – बोरीवली
मुंबईत अगदी एका दिवसात जाऊन येणारा हा समुद्रकिनारा असल्यामुळे तुम्हाला सुट्टी घेण्याची वेगळी गरज भासत नाही.
माथेरान
ठिकाण – नेरळ रेल्वेस्थानकावरून जवळ
माथेरान हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे पर्यटक उन्हाळ्यात सुद्धा माथेरानला गर्दी करतात. पावसाळ्यात सुद्धा येथील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
सगुणा बाग
ठिकाण – कर्जत
प्रवेश शुल्क – १ हजार प्रत्येकी
नेरळ रेल्वेस्थानकावरून तुम्ही सगुणाबागेत जाऊ शकता. कर्जत जिल्ह्यातील सगुणा बाग हे खास कृषीप्रेमी आणि गावाकडील अनुभव घेण्यासाठी असलेले पर्यटन स्थळ आहे. सगुणाबाग हे एक कृषी पर्यटन केंद्र आहे, याठिकाणी तुम्ही बैलगाडी सफर, मातीची घरे, स्नेक शो, बोटिंग, फिशिंग, विविध प्रकारचे प्राणी पक्षी पाहू शकता.
वज्रेश्वरी
ठिकाण – भिवंडी
वज्रेश्वरीला गरम पाण्याची कुंड असल्याने याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशविदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात. वज्रेश्वरी येथे जाऊन तुम्ही गरम पाण्याची कुंड, गणेशपूरी अशी विविध ठिकाणं पाहू शकता.
बाणगंगा तलाव
ठिकाण – वाळकेश्वर
वाळकेश्वर येथील बाणगंगा मंदिर फार प्रसिद्ध आहे. या परिसरात तुम्ही प्राचीन, सांस्कृतिक कलाकृतींचे दर्शन करू शकता. त्यामुळे पर्यटक, Influencer येथे गर्दी करतात, प्राचीन शिव मंदिरासमोर पाण्याचा तलाव आहे.
पांडवकडा
ठिकाण – नवी मुंबई
नवी मुंबईतील खारघरमधील पांडवकडा धबधबा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हिरव्यागार उंच डोंगरावरून वाहणार हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे, अनेक पर्यटक पावसात भिजण्यासाठी याठिकाणी पिकनिकला येतात. खारघरवरून रिक्षा किंवा खाजगी वाहनांनी तुम्ही पांडवकड्याला जाऊ शकता.
Join Our WhatsApp Community