Okinawa Praise Pro ही स्कूटर 87 हजार 593 रुपयांच्या एक्स- शोरुम किमतीत उपलब्ध आहे आणि लिथियम आयन बॅटरीसह येते. पूर्ण चार्ज केल्यावर, ही स्कूटर स्पोर्ट्स मोडमध्ये 88 किमीची रेंज देते. Okinawa Praise Pro ची टाॅप स्पीड 58 किमी/ तास आहे.
हिरो एडी ही कमी- स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ज्याला ऑपरेट करण्यासाठी नोंदणी आणि परवाना आवश्यक नाही. स्कूटर लिथियम आयन बॅटरीसह येते आणि पूर्ण चार्ज केल्यावर 85 किमीची रेंज देते. या स्कूटरची टाॅप स्पीड 25 किमी/ तास आहे. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.
( हेही वाचा: Post Office मध्ये गुंतवणूक करा! बॅंकेपेक्षा अधिक परतावा; जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना! )
हिरो इलेक्ट्रिकच्या एडी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्रुझ कंट्रोल, अॅंटी Thief लाॅक, फाॅलो मी हेडलाइट, रिव्हर्स मोड, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, यूएसबी पोर्ट अशी फीचर्स देण्यात आली आहेत. राइडचा दर्जा सुधारण्यासाठी यात रुंद सीट आणि मोठे अलाॅय व्हील्स देण्यात आले आहेत. हिरो एडीला 72 हजार रुपयांच्या एक्स- शोरुम किमतीत खरेदी करता येईल.
तुम्हाला जर उत्तम रेंज असलेली स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Hero Optime CX हा एक चांगला पर्याय आहे. ही स्कटूर 62 हजार 190 रुपये ( एक्स-शोरुम, दिल्ली) च्या किमतीत उपलब्ध आहे.
Hero Optima CX सिंगल बॅटरी आणि ड्युअल बॅटरी माॅडेल्समध्ये येतो. ड्युअल बॅटरी माॅडेलची रेंज 140 किमी आहे. ही स्कूटर 45 किमी/ ताशी वेगाने धावू शकते. याची ड्युअल लिथियम- आयन बॅटरी 4-5 तासांत पूर्ण चार्ज होते.
Join Our WhatsApp Community