Best Gaming Phones Under 20000 : हे गेमिंग फोन आहेत स्वस्त आणि मस्त; २०,००० रुपयांच्या आतील गेमिंग फोन

Best Gaming Phones Under 20000 : जून २०२४ मध्ये तुम्ही विकत घेऊ शकाल असे बजेट गेमिंग फोन बघूया.

146
Best Gaming Phones Under 20000 : हे गेमिंग फोन आहेत स्वस्त आणि मस्त; २०,००० रुपयांच्या आतील गेमिंग फोन
  • ऋजुता लुकतुके

अलीकडे दर महिन्याला नवीन स्मार्ट फोन लाँच होत असतात आणि प्रत्येकाचे फिचर वेगवेगळे असतात. त्यामुळे सामान्य ग्राहकांना फोनचे उपयोग, वापर याविषयी अद्ययावत माहिती कळणं तसं कठीणच आहे. म्हणूनच आम्ही इथं एक यादी देत आहोत, ज्यातून तुम्हाला गेमिंगसाठीचे स्वस्त आणि मस्त फोन कळू शकतील. २०,००० रुपयांच्या आत आणि तरीही फिचर्समध्ये उत्तम आणि वेगवान असलेले हे स्मार्टफोन आहेत. (Best Gaming Phones Under 20000)

आयक्यूओओ झेड९ ५जी (IQOO Z9 5G)

६.७ इंचाचा मोठा डिस्प्ले असलेला हा फोन एमोलेड डिस्प्ले सह येतो. हा पाणी, धूळ आणि प्रकाशापासून सुरक्षित फोन आहे. तसं प्रमाणपत्रही फोनला मिळालं आहे. १२० हर्ट्झ आणि १,८०० चा रिफ्रेश रेट या फोनला आहे. तर गेमिंगसाठी मिडियाटेक ७,२०० चिपसेट असलेला जी६१० जीपीयु या फोनमध्ये आहे. रॅम क्षमताही मॉडेलनुसार तुम्ही ८ जीबी पर्यंत निवडू शकता. (Best Gaming Phones Under 20000)

तर एसडी कार्ड वापरून स्टोरेजही १ टेराबाईटपर्यंत मिळू शकतं. फोनचा मुख्य कॅमेरा सोनीचा प्रायमरी सेन्सर असलेला आहे. (Best Gaming Phones Under 20000)

रिअलमी नारझो ७० प्रो

या फोनमध्ये ६.७ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले आहे. १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह इथं २,००० नीट्सची तीव्रताही मिळू शकते. त्यामुळे डिस्प्ले अत्यंत सुस्पष्ट असल्याचा दावा कंपनीने केला आहे. फोन पाण्यापासून सुरक्षित नाही. पण, धूळ आणि प्रखर प्रकाशापासून सुरक्षित आहे. फोनमधील प्रोसेसर मीडियाटेक डिमेन्सिटी ७०५० आहे. तर ग्राफिक्सशी संबंधित कामांसाठी फोनमध्ये जी६८ एमसी४ जीपीयू हा प्रोसेसरही देण्यात आला आहे. ८ जीबी रॅमसह २५६ जीबीचं स्टोरेज या फोनमध्ये मिळू शकतं. (Best Gaming Phones Under 20000)

(हेही वाचा – Nana Patole यांना सत्तेची मस्ती आली आहे का ?; पाय धुवून घेण्याच्या प्रकरणावरून चौफेर टीका)

विवो टी३

विवोचा हा मध्यम श्रेणीचा फोन आहे. ६.७ इंचांच्या एमोल्ड डिस्प्लेसह यात १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि १८०० नीट्सचा ब्राईटनेस आहे. शिवाय डिस्प्ले सुस्पष्ट असावा यासाठी २४०० बाय १८०० पिक्सेलचं रिझोल्युशनही आहे. फोनचा प्रोसेसर ४एनएम मीडियाटेक डिमेन्सिटी हा आहे आणि चिपसेट ७२०० क्षमतेचा आहे. ग्राफिक्ससाठी जी६१० एमसी४ जीपीयू देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आहे. स्टोरेज २५६ जीबींचं तर एसडी कार्ड वापरून १ टेराबाईट पर्यंत वाढवता येऊ शकतं. (Best Gaming Phones Under 20000)

रेडमी नोट १३

रेडमी नोट १३ हा फोन मीडियाटेक डिमेन्सिटी ६०८० या प्रोसेसरने युक्त आहे. आणि माली जी५७ जीपीयु यात आहे. या आधीच्या फोनच्या तुलनेत कंपनीने नोट १३ मध्ये कॅमेराच्या बाबतीत मोठा बदल केला आहे. गेमिंग प्रोसेसर तोच असला तरी या फोनमध्ये तब्बल १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फोनचं दुसरं वैशिष्ट्य त्याची बॅटरी हे आहे. कारण, गेमिंग फोनना चांगली बॅटरी लागते आणि या फोनबरोबर ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी येते. तसंच ३३ वॅटचा फास्ट चार्जिंग चार्जरही पॅकमध्येच येतो. (Best Gaming Phones Under 20000)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.