best hotels in rishikesh : ऋषिकेशला जाणार असाल, तर या हॉटेल्समध्ये रहा, मिळेल सर्वोत्तम सेवा!

115
best hotels in rishikesh : ऋषिकेशला जाणार असाल, तर या हॉटेल्समध्ये रहा, मिळेल सर्वोत्तम सेवा!

ऋषिकेश हे भारतातल्या उत्तराखंड राज्यातलं देहराडून नावाच्या जिल्ह्याजवळचं शहर आहे. ऋषिकेशच्या उत्तरेकडचा भाग देहराडून जिल्ह्यात आहे, तर दक्षिणेकडचा भाग पौरी गढवाल या जिल्ह्यात आहे. ऋषिकेश हे गंगा नदीच्या उजव्या काठावर वसलेलं शहर आहे. हे शहर हिंदूंचं तीर्थक्षेत्र आहे. प्राचीन काळात ऋषीमुनी आणि संतगण परम ज्ञानाच्या शोधार्थ या शहरात नदीकाठी ध्यान करत असत. ऋषिकेश येथे नदीच्या काठावर असंख्य मंदिरं आणि आश्रम बांधले आहेत. (best hotels in rishikesh)

ऋषिकेश हे “गढवाल हिमालयाचं प्रवेशद्वार” आहे असं मानलं जातं. तसंच “योग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड” म्हणून ओळखलं जातं. या शहरात १९९९ सालापासून मार्चच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन केलं जातं. ऋषिकेशमध्ये फक्त शाकाहारी अन्न खायला मिळतं. तसंच हे मद्यमुक्त शहर आहे. तिहरी नावाचं धरण ऋषिकेशपासून ८६ किमी इतक्या अंतरावर आहे. तसंच ऋषिकेश इथे गंगोत्रीच्या वाटेवर १७० किमी चढणीवर उत्तरकाशी नावाचं एक लोकप्रिय योगा डेस्टिनेशन आहे. (best hotels in rishikesh)

(हेही वाचा – Manika Batra : टेबलटेनिसमध्ये अंतिम १६ मध्ये पोहोचणारी मनिका बात्रा पहिली खेळाडू)

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या छोटे चार धाम म्हटल्या जाणाऱ्या तीर्थस्थळांच्या प्रवासासाठी ऋषिकेश हे अगदी महत्वाचं ठिकाण आहे. याव्यतिरिक्त हिमालयातली पर्यटन स्थळे जसे की हर्सिल, चोपटा, औली, डोडीताल, दयारा बुग्याल, केदारकंठा आणि हर की धून यांसारख्या ठिकाणी उन्हाळी आणि हिवाळी ट्रेकिंग करायला येणाऱ्या पर्यटकांसाठीही ऋषिकेश शहर हे एक महत्वाचं ठिकाण आहे. (best hotels in rishikesh)

दरवर्षी जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक ऋषिकेश या तिर्थस्थळाला भेट द्यायला येत असतात. यात्रेकरूंच्या राहण्याच्या सोयीसाठी या ठिकाणी कित्येक धर्मशाळा आणि हॉटेल्स बांधलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यापैकीच काही सर्वोत्तम हॉटेल्सची माहिती देणार आहोत. चला तर मग पाहुयात.. (best hotels in rishikesh)

  • होलीवॉटर

हे हॉटेल गंगा नदीच्या काठावर आहे. इथले अतिदक्ष कर्मचारी, अप्रतिम स्वच्छता आणि शांत वातावरण हे नक्कीच तुमचं मन मोहून घेईल. या हॉटेलमधल्या स्पा आणि योगा सत्र या सुविधा लोकप्रिय आहेत.

  • लेमन ट्री हॉटेल

हे हॉटेल गंगा नदीजवळ आहे. इथुन ऋषिकेश इथल्या जवळच्या सर्व तिर्थस्थळापर्यंत पोहोचता येतं. इथे जेवणाचीही सोय उत्तम आहे. याशिवाय लहान मुलांसाठी खेळायला इथे चांगलं वातावरण आहे.

  • हॉटेल ऍक्वा वाइब्स

हे लक्ष्मण झुला आणि तपोवन यांसारख्या प्रमुख ठिकाणांजवळ असलेलं प्रमुख हॉटेल आहे. इथला स्टाफ मनमिळाऊ आणि मेहनती आहे. इथे टापटीपपणा असतो. या हॉटेलचं वातावरणही चांगलं आहे.

  • संस्कृती वैदिक रीट्रीट

हे हॉटेल राम झुला जवळ आहे. या हॉटेलचा स्टाफ नम्रपणे ग्राहकांना सांभाळून घेतो. इथल्या रूम्स आणि वातावरण चांगलं आहे. पण कदाचित तुम्हाला इथे गाडी पार्क करण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

  • स्कायर्ड ऋषिकेश

हे निवासस्थान म्हणजे तुम्हाला चांगल्या आठवणी तयार करण्यासाठी एक चांगली जागा आहे. इथली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. या हॉटेलमध्ये तुम्ही बंजी जम्पिंग, जम्पिंग, रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग आणि कॅम्पिंग यांसारख्या अडव्हेंचर्सचाही आनंद घेऊ शकता. (best hotels in rishikesh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.